News Flash

अभिनेत्री स्मिता गोंदकरने केले बिकिनी शूट, पाहा फोटो

या फोटोंमध्ये स्मिता हॉट अंदाजात दिसत आहे.

बिग बॉस मराठी पर्व पहिलेमधील सर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर. स्मिता ‘पप्पी दे पारूला’ या गाण्यामुळे घराघरात पोहोचली होती. परंतु बिग बॉस मराठीमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. बोल्ड लूक, दिलखेचक अदा, ग्लॅमरस अंदाज यासाठी स्मिता विशेष ओळखली जाते. स्मिताचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. नुकताच स्मिताने तिचे बिकिनीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

स्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये स्मिता अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कमेंटचा वर्षावदेखील केला आहे.

नुकताच स्मिता ‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाची निर्मिती अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज यांनी केली आहे. हृषिकेश कोळी यांनी पटकथा संवाद लेखन केले. या चित्रपटात अभिनेते संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार अशी दमदार स्टारकास्ट आहे. गायक अवधूत गुप्ते, मुग्धा कऱ्हाडे, शाल्मली खोलगडे आणि मिक्का सिंग यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत.

वाचा आणखी: …म्हणून प्रभास करायचा नील नितिन मुकेशच्या गर्भवती पत्नीला फोन

स्मिता लवकरच राजू मिश्रा यांच्या ‘लव्ह बेटिंग’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात स्मितासह चिराग पाटील, काजल शर्मा, सायली शिंदे, अनंत जोग, राजेश श्रृगांरपूर, कमलेश सावंत, वैभव मांगले आणि अनिकेत केळकर हे देखील दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 1:42 pm

Web Title: smita gondkar bikini shoot avb 95
Next Stories
1 ‘ अभिजीत बिचुकलेंना हिंदी बिग बॉसमध्ये पाठवा’, असं का म्हणतोय सलमान खान
2 …म्हणून प्रभास करायचा नील नितिन मुकेशच्या गर्भवती पत्नीला फोन
3 ‘दिल चाहता है’च्या सिक्वलची चाहत्यांची मागणी, दिग्दर्शकांनी दिलं ‘हे’ उत्तर
Just Now!
X