आपल्या अभिनयाने सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारी मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे विवाहबंधनात अडकली आहे. १८ जानेवारी रोजी मुंबईमध्ये स्मिता अभिनेता विरेंद्र द्विवेदीसोबत लग्नाच्या बंधनात अडकली आहे. महाराष्ट्रीयन आणि उत्तर भारतीय अशा दोन्ही पारंपरिक पद्धतीने लग्न पार पडलं आहे. लग्नाला दोघांच्या कुटुंबातील मोजक्या लोकांना आमंत्रण देण्यात आलं होते. या लग्नाचे फोटो अभिनेत्री आणि स्मिताची अगदीजवळची मैत्रिण रेशम टिपणीसने सोशल मीडियावर  शेअर केले आहेत. रेशम टिपणीसने नवविवाहित दांपत्यांना लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत..

विरेंद्र द्विवेदी हा नाट्य कलाकार आहे. स्मिताने मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. जोगवा, ७२-माईल्स, परतु, देऊळ यासह विविध मराठी सिनेमात तसंच सिंघम रिटर्न्स, रुख अशा बॉलीवुडच्या सिनेमातही स्मिताने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

 

Instagram वर ही पोस्ट पहा

 

Very happy married life darling Smita .May u get my share of happiness too .