News Flash

दारु पिणाऱ्या ‘त्या’ तरुणांवर भडकला सलमान

'दारु पिणं आणि सिगारेट ओढणं या सवयी वाईट आहेत'

सलमान खान

बॉलिवूडचा ‘सुलतान’ सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरश: वेडे होतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. नुकताच सलमान त्याच्या वांद्रे येथील घरातून बँड स्टँडच्या दिशेने मॉर्निंग वॉकसाठी निघाला असता चाहत्यांचा एक ग्रुप त्याच्याजवळ आला आणि सेल्फी काढण्यासाठी विनंती करु लागला. सलमानच्या बॉडीगार्डने चाहत्यांना नकार देत सलमानला तेथून दूर नेलं. अनेकदा विनंती करुनही भाईजानसोबत सेल्फी काढायला मिळत नसल्याने ती मुलं तेथेच बसली.

सलमान जेव्हा मॉर्निंग वॉक करुन परतत होता तेव्हा तरुणांचा तोच ग्रुप त्याजागी बसून दारु पिताना आणि सिगारेट ओढताना दिसले. हे पाहताच सलमानचा राग अनावर झाला. तरुणांजवळ जाऊन सलमानने त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. दारु पिणं आणि सिगारेट ओढणं या सवयी वाईट आहेत असं त्याने समजावलं. सलमानचे म्हणणे गंभीरपणे घेत त्या तरुणांनीही हातातील दारुची बाटली आणि सिगारेट कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली.

वाचा : अभिषेकसोबत लग्न केल्याचा दावा करणारी ‘ती’ येणार ‘बिग बॉस ११’ मध्ये?

आपण समजावल्यानंतर तरुणांमध्ये झालेला बदल पाहून ‘दबंग’ खानसुद्धा खूश झाला आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढायला तयार झाला. गेल्या काही दिवसांपासून सलमान सर्वांसोबत चांगली नाती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. नुकतंच अंबानींच्या घरी गणपती दर्शनाला तो गेला असता, तेथेही आपला जुना मित्र संजय दत्तचीही गळाभेट घेतली.

वाचा : अक्षय कुमार या दाक्षिणात्य सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार

सलमानच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास आगामी ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचे चित्रीकरणदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा हा सिक्वल असून यामध्ये तो कतरिना कैफसोबत पुन्हा एकदा भूमिका साकारताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 4:57 pm

Web Title: smoking and drinking are bad habits says salman khan to his fans
Next Stories
1 गणपती आणि ईद यांचा संबंध जोडल्याने अभिनेत्री काजोलवर भडकला तरूण
2 अभिषेकसोबत लग्न केल्याचा दावा करणारी ‘ती’ येणार ‘बिग बॉस ११’ मध्ये?
3 ढोल-ताशांच्या गजरात सरस्वती करणार बाप्पाचे विसर्जन
Just Now!
X