News Flash

आशा भोसलेंनी सांगितलं स्मृती इराणींच्या विजयाचं कारण

आशा भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्मृती इराणी यांनी केलेल्या मदतीची माहिती दिली आहे

लोकसभा निवडणुकीत भाजपाला एकहाती मिळालेल्या विजयापेक्षाही सर्वात जास्त चर्चा जर कोणाची झाली असेल तर त्या म्हणजे स्मृती इराणी यांची. स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या विजयाची अनेक कारणं असून त्यातील एक कारण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सांगितलं आहे. आशा भोसले यांनी स्मृती इराणी यांनी आपल्याला केलेल्या मदतीचा उल्लेख करत त्या काळजी घेतात म्हणूनच जिंकल्या आहेत असं सांगितलं.

आशा भोसले गुरुवारी झालेल्या मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी हजर होत्या. शपथविधी संपल्यानंतर तेथून निघणाऱ्यांची गर्दी झाल्याने आशा भोसले त्यात अडकल्या होत्या. यावेळी स्मृती इराणी यांनी त्यांना तेथून सुखरुप बाहेर पडण्यास मदत केली. आशा भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्मृती इराणी यांनी केलेल्या मदतीची माहिती दिली आहे.

‘शपथविधीनंतर झालेल्या भयंकर गर्दीत मी अडकले होते. स्मृती इराणी वगळता कोणीही माझ्या मदतीसाठी पुढे आलं नाही. त्यांनी माझी स्थिती पाहिली आणि मी सुखरुप घरी पोहोचेन याची खात्री केली. त्या काळजी करतात म्हणूनच जिंकल्या’, असं आशा भोसले यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा तब्बल ५५, १२० मतांनी पराभव करत अमेठीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अमेठी हा काँग्रेसचा गड मानला जातो. पण स्मृती इराणी यांनी विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. स्मृती इराणींना अमेठीत ४,६७,५९८ तर राहुल यांना ४, १३, ३९४ इतकी मते मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत स्मृती इराणींचा १,०७,९०३ मताधिक्याने पराभव झाला होता.

गुरुवारी झालेल्या शपथविधीत स्मृती इराणी यांचादेखील सहभाग होता. स्मृती इराणींना कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. शपथविधी समारंभात उपस्थितांनी टाळ्यांचा उत्स्फूर्त गजर तीन नेत्यांसाठी केला. पहिले होते अमित शहा. भाजपच्या विजयात यांचा महत्त्वाचा वाटा आहे. दुसरे नेते होते नितीन गडकरी. पण सर्वाधिक कडकडाट झाला तो स्मृती इराणी यांच्यासाठी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 12:06 pm

Web Title: smriti irani rescue asha bhosale stranded pm oath ceremony
Next Stories
1 सलमानचा ‘भारत’ अडचणीत; चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी
2 मराठी वेब सिनेमा ‘संतुर्की’चा ट्रेलर प्रदर्शित
3 पाहा अंगावर काटा आणणारा ‘आर्टिकल १५’चा ट्रेलर
Just Now!
X