News Flash

स्मृती इराणींची भावूक पोस्ट; लग्नाच्या वाढदिवसाच्या पतीला दिल्या शुभेच्छा

एकता कपूरनेही दिल्या दोघांना शुभेच्छा

केंद्रिय मंत्री आणि पूर्वीच्या अभिनेत्री स्मृती इराणी यांच्या लग्नाचा आज वाढदिवस. २००१ साली त्यांनी जुबीन इराणी यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या या खास दिवशी निर्माती एकता कपूरने त्या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत तर स्मृती यांनी आपल्या पतीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक छोटीशी क्लीप शेअर केली आहे, ज्यात त्यांचे पतीसोबतचे फोटो आहेत आणि बॅकग्राऊंडला एक सुंदर गाणं आहे. या क्लीपमध्ये त्यांचे आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यावरचे फोटो आहेत. आजवरचा त्या दोघांचा प्रवास या क्लीपमध्ये मांडण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, “मैत्रीची, धमाल करण्याची आणि रोमांचकारी २० वर्षे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

एकता कपूरनेही स्मृती आणि त्यांचे पती यांचा एक जुना फोटो शेअर करत या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर “हॅप्पी ऍनिव्हर्सरी लव्ह बर्ड्स” असं कॅप्शनही त्याला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Erkrek (@ektarkapoor)

आपल्या पतीला उद्देशून केंद्रिय मंत्री स्मृती इराणी लिहितात, “मी ही गोष्ट स्वीकारली आहे की माझ्यासोबत कोणी सहजा सहजी राहू शकत नाही. मी कुणी सामान्य गृहिणी नाही. मी कायम माझ्या स्वप्नांच्या मागे धावत राहिले. पण या दरम्यान तू ही जबाबदारी घेतली की कोणत्याही प्रकारची कोणाचीही गैरसोय होऊ नये. मी तुझे आभार मानू शकते का?”

या पोस्टसोबत एकता कपूरचीही पोस्ट व्हायरल होत आहे आणि त्याला भरपूर लाईक्स मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 7:17 pm

Web Title: smruti iranis anniversary ekta kapoor wishes the couple vsk 98
Next Stories
1 आमिरनंतर ‘या’ अभिनेत्याने फिरवली सोशल मीडियाला पाठ!
2 सुझान नंतर बहीण फराहने देखील घेतला पतीसोबत विभक्त होण्याचा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली..
3 “कोणी मला खान आडनावाने बोलवू नये म्हणून..,” साजिद वाजिद मधील साजिदचा मोठा खुलासा
Just Now!
X