News Flash

न घाबरता सापांशी खेळते ‘ही’ अभिनेत्री

सापाला वाचवून नंतर त्याला पनवेल येथील जंगलात सोडून दिले

सलमान खानच्या ‘लकी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या स्नेहा उल्लालचा १८ डिसेंबर १९८७ मध्ये जन्म झाला. स्नेहा प्राणी प्रेमी आहे. आज तिच्या वाढदिवसादिवशी तिच्याबद्दल फार माहीत नसलेल्या गोष्टींवर टाकूयात एक नजर…

स्नेहा प्राण्यांसाठी खूप कार्य करताना दिसते. स्नेहाने ट्विटरवर एका पोस्टमध्ये सापासोबतचा एक फोटो शेअर करत म्हटले होते की, प्राण्यांना आपल्या मदतीची फार आवश्यकता आहे. स्नेहा सापांना जेवढी अलगद सांभाळते, तेवढेच तिच्या घरातले सांभाळू शकत नाहीत. पण तरीही तिच्या घरातील सदस्य सापांना हात लावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. स्नेहाने या सापाला वाचवून नंतर त्याला पनवेल येथील जंगलात सोडून दिले होते.

तसेच एका पोपटालाही तिने आपल्या घरी आसरा दिला होता. सकाळी त्याच्यासोबत गप्पा मारताना स्नेहा.

स्नेहाचे मांजरींवरही तेवढेच प्रेम आहे. तिच्याकडे दोन मांजरी असून पेप्सी आणि कोला अशी या दोन मांजरींची नावं आहेत. मांजरांसाठी स्नेहाने खास बेडही तयार केला आहे.

स्नेहा सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिने बॉलिवूड कॉलिंग असा मेसेज तिच्या पोस्टमध्ये लिहिला होता. त्यामुळे येत्या काळात स्नेहा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसू शकते असे म्हटले तर खोटे ठरणार नाही. २००५ मध्ये आलेल्या ‘लकी’ सिनेमात स्नेहा अगदी ऐश्वर्या रायसारखी दिसते यामुळे ती चर्चेत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 4:25 pm

Web Title: sneha ullal birthday pets lover interesting facts
Next Stories
1 सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज वाजपेयीच्या ‘अय्यारी’चा पोस्टर
2 हिमाचल प्रदेशमध्ये सलमानच्या बहिणीचे सासरे भाजपकडून विजयी
3 देह व्यापाराच्या आरोपाखाली दोन अभिनेत्रींना अटक
Just Now!
X