News Flash

करोनामुळे अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, पोस्टद्वारे दिली माहिती

पोस्ट शेअर करत ती भावूक झाली आहे.

Sneha wagh,

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचे करोनामुळे निधन झाले आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे स्नेहाने वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

स्नेहाने तिच्या फेसबुक अकाऊंटवर वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘न्यूमोनिया आणि करोना या आजारांशी महिनाभर झुंज दिल्यानंतर माझ्या वडिलांचे निधन झाले. माझा सगळ्यात मोठा आधारस्तंभच मी गमावला आहे. या प्रकारच्या वेदना यापूर्वी कधीही अनुभवल्या नव्हत्या. आपण कोणत्या परिस्थितीमधून जात आहोत याचा फरक पडत नाही. पण आपल्या पालकांना गमावल्यावर प्रचंड वेदना होतात’ या आशयाची पोस्ट तिने केली होती.

आणखी वाचा : ‘द गाझी अटॅक’मधील अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे करोनामुळे निधन

स्नेहाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील वडिलांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर २७ एप्रिल २०२१ रोजी वडिलांचे निधन झाल्याचे लिहिले आहे. स्नेहाने ‘ज्योती’, ‘वीरा’ आणि ‘चंद्रगुप्त मौर्य’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 4:12 pm

Web Title: sneha wagh father passes away due to covid 19 avb 95
Next Stories
1 ‘‘पैशासाठी आम्ही…”, पंजाब किंग्जच्या क्रिकेटपटूचा अक्षय कुमारला टोला
2 करोनाच्या संकटात शाहिद मीराचं योगदान, मदतीसाठी चाहत्यांना आवाहन
3 “आपल्यातही असे राक्षस आहेत”; पोस्ट शेअर करत आर माधवनने नेटकऱ्यांना केलं सावध
Just Now!
X