26 May 2020

News Flash

‘या’ मराठी अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड ११ वर्षांनी लहान

त्या अभिनेत्याच्या माजी प्रेयसीने हा खुलासा केला आहे.

‘ज्योती’ आणि ‘एक वीर की अरदास – वीरा’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री स्नेहा वाघ सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ही मराठी अभिनेत्री तिच्याहून ११ वर्षांनी लहान असलेल्या एका अभिनेत्याला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्या अभिनेत्याच्या माजी प्रेयसीने ज्योतीबाबत हा खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

Red Navami Special #navratri

A post shared by Sneha Wagh (@the_sneha) on

या अभिनेत्याचे नाव फैजल खान असे आहे. फैजलचे याआधी अभिनेत्री मुस्कान कटारियासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. ती देखील त्याच्यापेक्षा वयाने एक वर्षाने मोठी होती. परंतु आता दोघांचे ब्रेकअप झाले असुन फैजल आता ज्योतीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. मुस्कान कटारियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फैजलवर फसवणूकीचे आरोप केले आहेत. “प्रेमाचे खोटे नाटक करुन त्याने मला फसवले. माझ्या बरोबर प्रेमसंबंधात असताना तो इतर मुलींना डेट करायचा. सध्या तो स्नेहा वाघ या अभिनेत्रीला डेट करत असल्याची माहिती मला मिळाली त्यामुळे मी त्याच्याबरोबर असलेले सर्व संबंध तोडून टाकण्याचा निर्णय घेतला.” असे आरोप मुस्कानने फैजलवर केले आहेत.

यावर स्नेहाने देखील प्रतिक्रीया दिली आहे. “फैजल हा माझा फक्त चांगला मित्र आहे. आमच्यावर असे चुकीचे आरोप करणाऱ्या त्या मुलीला मी बिलकूल ओळखत नाही. मुस्कान केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी फैजल फसवणूकीचे आरोप करत आहे.” असे म्हणत स्नेहा वाघने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 6:31 pm

Web Title: sneha wagh muskaan kataria faisal khan mppg 94
Next Stories
1 नाना पाटेकर अखेर वर्षभरानंतर करणार कमबॅक
2 रंगभूमीवर पुन्हा एकदा गंधर्वयुग
3 ..म्हणून दीपिकाने ‘छपाक’साठी वापरलेले प्रोस्थेटिक्स जाळले
Just Now!
X