ट्विटर हे सेलिब्रिटींचं व्यक्त होण्यासाठीचं सर्वात आवडतं माध्यम आहे. कमीत कमी शब्दात आपलं मत मांडण्याचा पर्याय या मायक्रो ब्लॉगिंग साइटनं युजर्सनां दिला आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट चाहत्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर बॉलिवूड सेलिब्रिटींचा आवडता पर्याय म्हणजे ट्विटर होय. आज ‘सोशल मीडिया डे’ निमित्त आपण ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले सेलिब्रिटी पाहणार आहोत.

शाहरुख खान
बॉलिवूडचा ‘बादशहा’, ‘किंग खान’ ट्विटरवरदेखील फॉलोअर्सच्या बाबतीत ‘किंग’ ठरला आहे. भारतीय सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स हे शाहरुख खानचे आहे. शाहरुखनं गेल्याच वर्षी अमिताभ बच्चन यांना मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं. शहारूखचे ट्विटरवर ३ कोटी ५९ लाख ३० हजार १६९ फॉलोअर्स आहेत.

अमिताभ बच्चन
काही वर्षांपूर्वी ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीय व्यक्तींच्या यादीत अमिताभ बच्चन हे अव्वल होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाल्यानंतर बिग बी दुसऱ्या क्रमांकावर आले. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपल्या फॉलोअर्सची संख्या ट्विटर कमी दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. जर ट्विटरनं फॉलोअर्सची संख्या अशीच कमी दाखवली तर मी ट्विटरला रामराम ठोकेन असा इशारांही त्यांनी दिला होता. अमिताभ बच्चन यांचे ट्विटरवर ३ कोटी ४७ लाख ८२ हजार २७४ फॉलोअर्स आहेत.

सलमान खान
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान. सलमानचे ट्विटरवर ३ कोटी ३९ लाख ६७ हजार ७९७ फॉलोअर्स आहेत.

अक्षय कुमार
‘खिलाडी’ अक्षय कुमार या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. अक्षयचे २ कोटी ७३ लाख, ९७ हजार १४२ फॉलोअर्स आहेत. अनेक सामाजिक प्रश्नांवर ट्विटरच्या माध्यमातून अक्षय व्यक्त होतो.

दीपिका पादुकोण
ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या पहिल्या दहा व्यक्तींच्या यादीत दीपिका पादुकोण या एकमेव अभिनेत्रींचा समावेश आहे. दीपिकाचे ट्विटरवर २ कोटी ४२ लाख ७६ हजार ५४६ फॉलोअर्स आहेत.