News Flash

‘पिछे देखो पिछे’ म्हणत नेटकऱ्यांची मनं जिंकणाऱ्या अहमदचा सोनू सूदसाठी खास मेसेज; म्हणाला…

सोनू सूदसाठी पाठवलेला अहमद शाहचा हा क्युट व्हिडीओ नक्की पाहा

बऱ्याच वेळा सोशल मीडियावर स्टारकिडच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असते. मात्र, यावेळी कोणताही स्टारकिड चर्चेत नसून चक्क पाकिस्तानातील एक चिमुकला चर्चेत आला आहे. या चिमुकल्याने थेट पाकिस्तानातून अभिनेता सोनू सूदसाठी एक मेसेज पाठवला आहे.
सोशल मीडियावर चर्चेत राहणारा अहमद शाह हे नाव अनेक जणांना माहित असेल. पाकिस्तानात राहणारा हा चिमुकला त्याच्या बोलण्याच्या स्टाइलमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत असतो. यामध्येच त्याने सोनू सूदसाठी एक खास मेसेज पाठवला असून तुम्ही फार छान काम करताय असं त्याने म्हटलं आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोनू सूद सातत्याने गरजुंची मदत करत आहे. स्थालांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहचविण्यापासून ते विदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशात आणेपर्यंत सोनूने विविध माध्यमातून नागरिकांची मदत केली आहे. त्यामुळे त्याचे आता जगभरात चाहते झाल्याचं दिसून येत आहे. यामध्येच एक नाव आहे, अहमद शाह. या चिमुकल्याने एक व्हिडीओ शेअर करत सोनूच्या कामाचं कौतुक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

Cute love Message from little Angels Ahmad shah nd Umer for @sonu_sood Sir

A post shared by Peer Ahmad Shah (@cuteahmadshah01) on

“हॅलो सोनू सूद सर. तुम्ही कसे आहात, ठीक आहात ना? मी सुद्धा ठीक आहे. मी अहमद शाह आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप प्रेम. तुम्ही खूप छान आणि चांगलं काम करत आहात”, असा मेसेज अहमदने सोनूसाठी पाठवला आहे.

दरम्यान, अहमद शाह या चिमुकल्याचे जगभरात चाहते आहेत. पिछे देखो पिछे या व्हिडीओमुळे तो विशेष चर्चेत आला होता. त्याला या व्हिडीओनंतर तुफान लोकप्रियता मिळाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 8:31 am

Web Title: social media star cute kid from pakistan ahmed shah sent video message to sonu sood for appreciating actors work ssj 93
Next Stories
1 बंद असलेल्या चित्रपटगृहांना आशेचा किरण
2 ‘जानसे मारेंगे तभी जी पायेंगे.. ‘ मिर्झापूर 2 चा आणखी जबरदस्त टिझर
3 करोना काळात नैराश्येवर मात करण्यासाठी काय कराल? गायक हरिहरन यांनी दिल्या सोप्या टीप्स
Just Now!
X