News Flash

Kaabil : हृतिक रोशनच्या ‘काबिल’मध्ये सहा चुका; सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली

त्याच्या हातात मेणबत्ती का देण्यात आली आहे.

Kaabil : हृतिक रोशनच्या ‘काबिल’मध्ये सहा चुका; सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली

बॉलीवूडमध्ये चित्रपटातील हिरोचा एक खास रोल असतो. चित्रपटातील खलनायक कितीही ताकदवर असला तरी त्यातील हिरोपुढे त्याचे काहीच चालत नाही. अखेर हिरो खलनायकाला मात देतोच. हिरोला ताकदवर दाखविण्यासाठी बरेच प्रयोग केले जातात. त्यामुळे चित्रपटात अशा काही गोष्टी पाहावयास मिळतात ज्या पचवणं कठीण होऊन जाते. नुकताच प्रदर्शित झालेला अभिनेता हृतिक रोशनचा चित्रपट ‘काबिल’मध्येही अशीच काही दृश्ये आहेत. या चित्रपटात हृतिकने रोहन या अंध व्यक्तिची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत हृतिकने अशा काही गोष्टी केल्या आहेत ज्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे. त्याचसोबत काही गोष्टींमागचा तर्क लावणेही कठीण होऊन जाते. हे आम्ही नाही तर सोशल मिडीयावरील नेटीझन्स बोलत आहेत.

‘काबिल’ चित्रपटातील हृतिकच्या काही गोष्टी सोशल मिडीया युजर्सच्या पचनी पडलेल्या नाहीत. या गोष्टींची आता सोशल मिडीयावर खिल्ली उडवली जात आहे. इन्स्टाग्राम या सोशल मिडीया माध्यमावर ‘ट्रोल.एसआरके.हेटर्स’ नावाचे पेज आहे. या पेजवर हृतिकच्या चित्रपटाची बरीच खिल्ली उडवली जात आहे. यातील पहिल्या फोटोत हृतिकच्या हातात एक मेणबत्ती दिसते. जर चित्रपटातील रोहन (हृतिक रोशन) बघू शकत नाही तर त्याच्या हातात मेणबत्ती का देण्यात आली आहे. असा विचार केल्यास हे दृश्य अजिबात समजत नाही. या कोलाजातील एका फोटोत रोहन त्याच्या पत्नीला बिल्डिंग बाहेरील दृश्य बोटाने दाखवत आहे. पण, चित्रपटात त्याची पत्नीदेखील (यामी गौतम) अंध दाखविण्यात आली आहे. चित्रपटामध्ये हृतिक अॅक्शनदृश्य अगदी सहज अॅक्श हिरोप्रमाणे करताना दिसतो. तर दुसरीकडे तो टँगो हा डान्स प्रकारही अगदी खूबीने करतो. तसेच, नेटीझन्सने चित्रपटात त्याने अगदी व्यवस्थित कपडे घालण्याच्या कौशल्याचीही खिल्ली उडवली आहे.

k1-2

दरम्यान, ‘रईस’च्या तोडीने मैदानात उतरलेला हृतिक रोशन आपल्या सगळ्या कलागुणांनी प्रेक्षकांना आपण ‘काबिल’ आहोत हे दाखवून देण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र चित्रपटात कथेला फारसा वावच नसल्याने एकटय़ा हृतिकच्या काबिलियतवर चित्रपटाची नैय्या पार लागली आहे. एरव्ही अ‍ॅक्शनपटांमध्ये माहिर असलेले दिग्दर्शक संजय गुप्ता या चित्रपटासाठी फारच कमी पडले आहेत. चित्रपटाचे ‘व्हीएफएक्स’ही हास्यास्पद असल्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपट एखाद्या सेटवर घडवून आणला जात असल्याची भावना प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2017 12:18 pm

Web Title: social media users trolling on the silly mistakes in hrithik roshan starer kaabil
Next Stories
1 १० लाखांसाठी स्पर्धकाने सोडले ‘बिग बॉस हाउस’
2 Miss Universe 2017 : ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणा-या रोश्मिताबद्दल ७ खास गोष्टी
3 ‘पद्मावती’ चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्याचा भन्साळी यांचा निर्णय
Just Now!
X