मॉडेलिंग विश्वातून अचानक नन बनण्याचा निर्ण घेतल्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोफिया हयात चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी सोफियाने साखरपुडा केल्याचे सांगून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सोफिया म्हणाली की, सगळ्यांनाच माझ्या भावी नवऱ्याचे नाव जाणून घेण्याची उत्सुकता आहे. पण आता पर्यंत मी शांत होते कारण तो कोणी सेलिब्रेटी नाही. मी त्याला प्रसारमाध्यमांपासून वाचवत होते, म्हणून इतके दिवस मी त्याच्याबाबत काहीच बोलत नव्हते.

सोफिया पुढे म्हणाली की, त्याचे नाव व्लाद स्टानेस्कु आहे. तो रोमानियाचा एक इंटिरिअर डिझायनर आहे. तो फार हुशार आहे. स्टानेस्कुने सौदी अरेबियाचा राजा फहद, कैंब्रिजचा राजकुमार विलियम ड्यूक, ब्रुनीचा सुलतान यांच्यासाठी काम केले आहे. तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. आम्ही जेव्हाही रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जातो तो आधी मला बसू देतो आणि मग तो बसतो, माझ्यासाठी गाडीचा दरवाजा आधी उघडतो. तो मला फार खूश ठेवतो. त्याने माझे आयुष्य सुकर बनवले आहे.

https://www.instagram.com/p/BRtoci6Bg5q/

जेव्हा आम्ही जेवायला गेलो तेव्हा त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आणि लग्नासाठी मागणी घातली. मी त्याला हो बोलले. दोन दिवसांनंतर आम्ही एकमेकांना अंगठी घातली. २४ एप्रिलला सोफिया विवाह बंधनात अडकणार आहे. सोफियाचे लग्न हिंदू, मुस्लिम, ग्नोस्टिक, ख्रिश्चन, बौद्ध आणि तिबेटी धर्मानुसार होणार आहे. सोफियाने सांगितले की, तिचे कुटुंबियंही व्लादला पसंत करतात.

https://www.instagram.com/p/BRtxdc1htSd/

https://www.instagram.com/p/BRHXBExBVFQ/