बिग बॉगची माजी स्पर्धक आणि मॉडेल सोफिया हयात ही वादग्रस्त वक्तव्य आणि तितक्याच वादग्रस्त आयुष्यासाठी ओळखली जाते. कधी मॉडेल तर कधी सर्व सूखांपासून तिनं घेतलेला संन्यास हा चर्चेचा विषय असतो. त्यानंतर आता सोफिया पुन्हा एकदा चर्चेत आली असून तीन साऱ्यांचे आराध्य दैवतश्री गणेशाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळे सध्या नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठविली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोफियाने काही दिवसापूर्वी गणपती बाप्पाबरोबर एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला सोफियाने दिलेल्या कॅप्शनमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

‘साऱ्यांच आराध्य दैवत असलेला गणेशा हा माझाच मुलगा आहे. प्रत्येक आईला तिचा मुलगा प्रिय असतो तसाच मलाही माझा मुलगा श्रीगणेशा प्रिय आहे. तो केवळ गणेशच नाही तर आल्लाहचं एक रुप आहे’,असं वादग्रस्त कॅप्शन सोफियाने या फोटोला दिलं आहे.

सोफियाने हा फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला लक्ष्य करत चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. काही नेटकऱ्यांनी तिला मानसिक स्वास्थ खालावलं आहे का असा प्रश्नही विचारला आहे. तर काहींनी तिला मुर्खात काढलं आहे.

दरम्यान, सोफिया यापूर्वी काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आली होती. त्यामुळे सोशल मीडियावरही तिच्यावर अनेक वेळा नेटकऱ्यांकडून टीकास्त्र सोडले गेल्याचं पाहायला मिळालं आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sofia hayat troll for calling lord ganesha is my son and allah
First published on: 20-09-2018 at 11:48 IST