12 December 2017

News Flash

‘होय, मी बाबा होणार’

अभिनेत्री सोहा अली खान हिला मातृत्वाची चाहूल लागल्याचे कळते.

मुंबई | Updated: April 21, 2017 6:48 PM

सोहा अली खान आणि कुणाल खेमू हे आई-बाबा होणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांना डिसेंबरमध्ये मुलगा झाला. त्यानंतर आता हे जोडपे लवकरच मामा-मामी होणार आहेत. सैफची लहान बहिण आणि अभिनेत्री सोहा अली खान हिला मातृत्वाची चाहूल लागल्याचे कळते. पहिल्यांदाच आई-बाबा होणारे सोहा आणि कुणाल खेमु सध्या खूप आनंदात आहेत. ‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार या सेलिब्रिटी जोडप्याच्या निकटवर्तीयांनी यासंबंधीचे वृत्त दिल्याचे कळते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहा अली खान आणि कुणाल खेमू हे आई-बाबा होणार आहेत. या दोघांसोबत त्यांच्या कुटुंबाचाही आनंद सध्या गगनात मावत नाहीये. आधी करिनाने डिसेंबर महिन्यात गोंडस बाळाला जन्म देऊन खान कुटुंबाला गोड बातमी दिली. त्यानंतर सोहाने दिलेल्या गूड न्यूजमुळे खान कुटुंबाचा आनंद आता द्विगुणीत झाला आहे. हे वृत्त समजताच ‘पिंकविला’ने कुणालशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कुणालने या वृत्ताला दुजोरा दिला असून तो म्हणाला की, होय, हे खरं आहे. आम्ही आई-बाबा होणार असल्याचं सांगताना सोहा आणि मला खूप आनंद होतोय. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. त्याचसोबत सोहानेसुद्धा ती आई होणार असल्याचे सांगितले.

अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान हे २५ जानेवारी २०१५ रोजी विवाहबंधनात अडकले होते. त्यांनी यावर्षी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवसही साजरा केला.

First Published on April 21, 2017 6:48 pm

Web Title: soha ali khan is pregnant kunal kemmu ready to welcome their first child