News Flash

‘या’ फोटोमुळे सोहाला मागावी लागली सैफची माफी

तिने 'सॉरी भाई' म्हणत माफी मागितली.

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान गेल्या काही काळात चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमुळे जास्त चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने कुटुंबीयांसह तिची आई शर्मिला टागोर यांचा वाढदिवस साजरा केला होता. या वाढदिवसाच्या निमित्ताने काढलेला एक फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. आश्चर्याची बाब म्हणजे या फोटोमध्येच तिने सैफ अली खानची माफी मागितली आहे.

सुपर मॉम : मॅचच्या ‘ब्रेक’दरम्यान तिने केलं स्तनपान, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

सोहाने पोस्ट केलेल्या या फोटोत सर्व जण कॅमेऱ्याकडे बघत आहेत. मात्र सैफ अली खानचा मुलगा तैमूर व सोहाची मुलगी इनाया केककडे पाहात आहेत. व सैफ कुणाल खेमूकडे पाहात आहे. यावरुनच तिने आपल्या भावाची सोशल मीडियावरुन खिल्ली उडवली. परंतु त्याच पोस्टमध्ये तिने ‘सॉरी भाई’ म्हणत माफी देखील मागितली.

‘कांदा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा’, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

“एकाच फ्रेममध्ये इतके सगळे जण असताना, सर्वांचे डोळे उघडे आहेत की नाही हे पडताळून फोटो काढणं जवळपास अशक्य असतं. सर्वांचं लक्ष कॅमेऱ्याकडे असताना तैमूर आणि इनाया यांचं सगळं लक्ष मात्र केवळ केककडेच आहे ” अशा आशयाची पोस्ट करताना तिने सैफची माफी देखील मागितली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 5:56 pm

Web Title: soha ali khan says sorry bhai to saif ali khan mppg 94
Next Stories
1 गुगलवर सर्वाधिक सर्च होतेय ‘ही’ हॉट अभिनेत्री
2 प्रियांकाने शेअर केला मांजरीचा व्हिडीओ; तुमच्या चेहऱ्यावरही येईल हसू
3 होऊ दे खर्च : विराट अनुष्कानं लग्नासाठी केलेल्या खर्चाचा आकडा माहिती आहे का?
Just Now!
X