07 March 2021

News Flash

‘ट्युबलाइट’ मधील सोहेल खानचा लूक झाला लीक

शूटिंगच्या वेळचा सोहेलचा हा लूक लिक झाला

'ट्युबलाइट' या सिनेमात सोहेल खानचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे

सलमान खानने काही दिवसांपूर्वी त्याचा आगामी सिनेमा ‘ट्युबलाइट’च्या दुसऱ्या सत्राचे मनालीमधील शूटिंग पूर्ण केले. या सिनेमात सलमानसोबत सोहेल खानचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. शूटिंगच्या वेळचा सोहेलचा हा लूक लिक झाला. या फोटोमध्ये सोहेल एका खाकी रंगाच्या लष्करी गणवेशात दिसत आहे.

१९६२ मध्ये भारत आणि चीन दरम्यान झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचे कथानक आधारलेले आहे. या सिनेमात प्रेमकथा दाखवली आहे. सलमानच्या चाहत्यांना या सिनेमाविषयी आणि त्यांच्या भूमिकेविषयी उत्सुकता आहे. या सिनेमातील सलमानच्या लूकवरून तरी तो सैनिकाच्या रुपात दिसणार हे नक्की. या सिनेमात सलमानसोबत चीनमधली प्रसिद्ध अभिनेत्री झू झू ही देखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीने आपला सलमान सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. कबीर खानच्या ‘ट्यूबलाइट’ सिनेमात काम करण्यासाठी झू झू फारच उत्सुक आहे. तिने याबद्दल ट्विटही केले. तिचे म्हणणे आहे की, ‘या सिनेमात सलमानबरोबर काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मी त्यांच्या कलागुणांची फॅन झाले आहे. या सिनेमाची संहिता मनाला भावणारी आहे,’ असेही ती म्हणाली.

13_10_2016-sohail1

सिनेमाचा दिग्दर्शक कबीर खानने काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले होते. आतापर्यंत या सिनेमाच्या चित्रिकरणाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत. लदाखमध्ये या सिनेमाचे अर्धे चित्रिकरण झाल्यानंतर याचे दुसऱ्या सत्राचे चित्रिकरण काश्मिरमध्ये होणार होते. पण काश्मिरमधली युद्धजन्य स्थिती पाहता उरलेले चित्रिकरण मनालीमध्ये करण्याचा निर्णय कबीर खान याने घेतला. ईदच्या दिवशी सलमानचा ‘ट्युबलाइट’ हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 7:45 pm

Web Title: sohail khan look from tubelight leaked
Next Stories
1 हो, मी ‘बी-ग्रेड’ चित्रपटांमध्येही काम केले आहे- कंगना रणौत
2 ..तर ‘बाहुबली’ मध्ये दिसली असती सोनम कपूर
3 या अभिनेत्रीला ट्विटरवर घातली लग्नाची मागणी
Just Now!
X