बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खान, सोहेल खान आणि त्याचा मुलगा निर्वाण खान यांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. अरबाज, सोहेल आणि निर्वाण यांच्या विरोधात सोमवारी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साथरोग प्रतिबंधक कायद्याद्वारे महापालिकेकडून खार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांना ताज हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.

नुकताच सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे अरबाज खान, सोहेल खान आणि त्याचा मुलगा निर्वाण यांना ताज हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

समोर आलेल्या माहितीनुसार अरबाज, सोहेल आणि निर्वाण हे २५ डिसेंबर रोजी यूएईवरुन मुंबईत परतले होते. त्यानंतर विमानतळावर मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बुकींग असल्याचे सांगून ते परस्पर घरी निघून गेले होते. एकीकडे करोनाचे नवे संकट येत असताना, बॉलिवूडमधील बड्या कलाकारांकडून अशा प्रकारचा हलगर्जीपणा करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर तिघांविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नव्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार ब्रिटन व यूएईवरून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात रहावे लागते. विमानतळावरून नियमांचा भंग करून परस्पपर घरी पळून गेल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.