News Flash

“या पोस्टसाठी किती पैसे मिळाले”; ट्रोल करणाऱ्या युजरला सोनम कपूरने केलं ब्लॉक

ईदच्या शुभेच्छानंतर सोनम ट्रोल

बॉलिवूड सेलिब्रिटींना अनेकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. कोणत्या पोस्टवर नेटकरी कशी प्रतिक्रिया देतील याचा काही नेम नाही. अभिनेत्री सोनम कपूरने नुकताच एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. सोनमने तिचा  ‘सांवरिया’ या पहिल्या सिनेमातील गाण्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र एका युजरने सोनमला यानंतर ट्रोल केलं.

सोनमने १३ मे ला ईदच्या निमित्ताने हा व्हिडीओ शेअर केला होता. ‘देखो चाँद आया’ या गाण्याचा व्हिडीओ तिने शेअर केला. या व्हिडीओला अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देत सोनमला देखील ईदच्या शुभेच्छा दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

मात्र यावर एका युजरने तिला “या पोस्टसाठी तिला किती पैसै मिळाले विचारा” अशी कमेंट केली आहे. यानंतर सोनम कपूरने या युजरला ब्लॉक केलं. एवढचं नाहीतर ब्लॉक करतानाची स्क्रीन रेकॉर्डिंग तिने इन्स्टा स्टोरीला शेअर केली आहे.

sonam-post

वाचा: ईदच्या शुभेच्छा दिल्याने कंगना रणौत ट्रोल; “तू हिंदू मुस्लिमांमध्ये भेद का निर्माण करतेस?”

सोनम कपूरने या युजरला ब्लॉक करताना “गुंडगिरी आणि छळ” हा पर्याय निवडत युजरला ब्लॉक केलं. या शिवाय या व्हिडीओवर तिने “खूप समाधानकारक” असं कॅप्शन देत या युजरला ब्लॉक केल्य़ाने आनंद मिळाल्याचं म्हंटलं आहे.

सोनम कपूर सध्या पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये काही. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असून वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. बऱ्याच काळापासून सोनम सिनेसृष्टीपासून दूर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 4:14 pm

Web Title: somam kapoor blocked user who asked her how much she get paid for post kpw 89
Next Stories
1 ‘मनी हाईस्ट’ मधील ‘Bella Ciao’च्या कडक मराठी व्हर्जनची चर्चा!
2 सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ दोन भागांमध्ये होणार रिलीज
3 ‘यांचा रुपयाही घेऊ नका’, अमिताभ यांना २ कोटी परत देण्याची परमिंदर सिंग यांची मागणी
Just Now!
X