24 September 2020

News Flash

“मैत्रीला वेळेचं बंधन नसतं”; हृतिकला येतेय कोई मिल गयामधील ‘जादू’ची आठवण, कारण…

१७ वर्षानंतर तो व्हिडीओ पोस्ट करुन जागवल्या आठवणी

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम चर्चेत असतो. मात्र यावेळी हृतिक चक्क ‘जादू’मुळे चर्चेत आहे. हृतिकला १७ वर्षानंतर ‘कोई मिल गया’ चित्रपटातील आपल्या एलियन मित्राची आठवण येत आहे. “मैत्रीला वेळ आणि जागेची मर्यादा नसते”, असं म्हणत त्याने आपल्या या खास मित्रासाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Justice For Sushant: अमेरिकेतील चाहत्यांचा सुशांतच्या कुटुंबीयांना पाठिंबा

अवश्य पाहा – WWE मध्ये नोकर कपात; या सुपरस्टार्सला दाखवला बाहेरचा रस्ता

‘कोई मिल गया’ हा एक सायंन्स फिक्शन चित्रपट आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला तब्बल १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने हृतिकला एलियन मित्र ‘जादू’ची आठवण येत आहे. हृतिकने जादूसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट करुन आपल्या जूना आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. “काही मैत्री वेळ आणि जागेच्या पलिकडल्या असतात. मला खात्री आहे एक दिवस आपण पुन्हा भेटू. तुझी खूप आठवण येतेय जादू.” अशा आशयाचं ट्विट हृतिकने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

‘कोई मिल गया’ हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची पटकथा रोहित मेहरा आणि एका एलियनच्या मैत्री भोवती फिरते. एलियन्सची एक टीम पृथ्वीवर परिक्षण करण्यासाठी येते. दरम्यान या टीममधील एक एलियन कुठल्याशा कारणामुळे पृथ्वीवरच अडकतो. या एलियनची रोहित मेहरासोबत मैत्री होते. या एलियनचं नाव तो जादू असं ठेवतो. त्यानंतर दोघांची मैत्री आणि एलियनच्या सुपरपावर्स याभोवती हा चित्रपट फिरतो. अभिनेता इंद्रवदन पुरोहित यांनी या चित्रपटात ‘जादू’ची भूमिका साकारली होती. तर हृतिकने रोहित मेहरा ही व्यक्तिरेखा साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 3:48 pm

Web Title: some friendships defy space and time koi mil gaya hrithik roshan jadoo mppg 94
Next Stories
1 सोनू सूदचं ‘मिशन घर भेजो’ सुरुच; आता ‘या’ देशातून भारतीयांना आणलं मायदेशी
2 “…हेच मत सुशांतसिंह राजपूत प्रकरणात व्यक्त झाले तर काय चुकले?”
3 ‘जनता तुला माफ करणार नाही’; रियाला पाठिंबा देणाऱ्या आयुषमानवर संतापला अभिनेता
Just Now!
X