दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या लग्नातील फोटो गुरुवारी समोर आले. रणवीर आणि दीपिकाने सोशल मीडियावर हे फोटो टाकताच क्षणार्धात ते व्हायरल झाले. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम सगळीकडेच या फोटोंची चर्चा होती. दीप-वीरने लग्नात कोणता पोशाख परिधान केला याची उत्सुकता सर्वांनाच होती. विशेष म्हणजे लग्नात वधूच्या पोशाखाकडे सर्वांचं लक्ष असतं. पण अतरंगी फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीरच्या पोशाखाकडे यावेळी अनेकांचं लक्ष होतं. त्यामुळे लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर त्याचे गमतीशीर मीम्स व्हायरल होणं साहजिक होतं. रणवीर सिंगला चर्चेत येण्यासाठी कोणत्या कारणाची गरज नसते. त्याच्या कपड्यांपासून ते माध्यमांच्या प्रश्नांना सराइतपणे उत्तरं देण्याच्या अनोख्या अंदाजामुळे तो नेहमीच प्रकाशझोतात राहिला आहे. नेहमीच्या सूट आणि फॉर्मल कपड्यांना बाजूला सारत त्याचं चौकटीबाहेरचं फॅशन स्टेटमेंट बऱ्याच कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळालं. म्हणूनच नेटकऱ्यांनी त्याच्या फॅशनवरून भन्नाट मीम्स पोस्ट केले आहेत. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल हे नक्की. @Atheist_Krishna Bhai this is original pic.twitter.com/3e7rbdufMc — kanhaiya gurjar (@kgurjar253) November 15, 2018 Internet after seeing Deepika and Ranveer’s wedding pics #DeepveerKiShaadi #DeepikaWedsRanveer pic.twitter.com/qz579DJczA — RanveerSinghTBT | #Ladkewale (@RanveerSinghtbt) November 15, 2018 इटलीतील लग्न सोहळ्यासाठी कुटुंबातील केवळ मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. पण, जे लग्नासाठी इटलीत उपस्थिती राहणार नाही त्यांच्यासाठी मुंबईत जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. २८ नोव्हेंबरला मुंबईतील ग्रँट हयात या आलिशान ठिकाणी दीप-वीरची रिसेप्शन पार्टी असणार आहे. या पार्टीसाठी संपूर्ण बॉलिवूडला आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडमधल्या बड्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार हे नक्की.