25 September 2020

News Flash

#MeToo : ”काहींनी पैसे स्वीकारून तोंड बंद ठेवलं”; टीव्ही अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

'बडे अच्छे लगते है' या मालिकेतील भूमिकेमुळे ही अभिनेत्री प्रकाशझोतात आली.

चाहत खन्ना

‘मी टू’ मोहिमेमुळे कलाक्षेत्रातील काही जणी हक्काने त्यांच्याबरोबर घडलेल्या गैरवर्तनाबाबत धैर्य एकवटून बोलू लागल्या होत्या. पण असेही काही जण आहेत जे याबद्दल खुलेपणाने बोलणं अजूनही टाळतात. याबाबतच टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाने धक्कादायक खुलासा केला आहे. कास्टिंग काऊचमुळे चित्रपटांपासून दूर राहिल्याचं चाहतने या मुलाखतीत सांगितलं.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत चाहतने चित्रपटांपासून दूर राहण्यामागचं कारण सांगितलं. ”कास्टिंग डायरेक्टरसुद्धा अशा घटनांमध्ये सहभागी असतात. मात्र कोणीच याची कबुली देणार नाही. कास्टिंग काऊच खूप मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीत आहे,” असं ती म्हणाली.

याविषयी ‘मी टू’ मोहिमेदरम्यान खुलासा का केला नाही असं विचारलं असता ती पुढे म्हणाली, ”काहीजणींनी चेक घेऊन तोंड बंद ठेवलं आणि ज्यांचा पब्लिसिटी स्टंट होता त्यांना तो कामी आला. फॅशन ट्रेण्डसारखा तो एक काळ होता. बऱ्याच अभिनेत्रींनी तोंड बंद ठेवणंच पसंत केलं.”

‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतील भूमिकेमुळे चाहत प्रकाशझोतात आली. ती संजय दत्तच्या आगामी ‘प्रस्थानम’ या चित्रपटात झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 11:47 am

Web Title: some took cheques and kept quiet television actress chahatt khanna shocking claim on me too ssv 92
Next Stories
1 अनुष्का- विराटच्या बीच फोटोंवर ‘मान्यवर स्विमवेअर’ म्हणत नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
2 सुपरहिरो वंडर वुमनसोबत काम करणार बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता…
3 ..म्हणून उषाताई म्हणतात, सोज्वळ रुपात मला प्रेक्षक स्वीकारणार नाहीत
Just Now!
X