07 March 2021

News Flash

सई ताम्हणकरच्या ‘त्या’ घोषणेने चाहत्यांमध्ये चर्चा

सईच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण सईने काहीतरी नवीन लवकरच येणार असल्याची घोषणा या पोस्टमधून केली आहे. त्याच्या एक दिवस आधी तिने इन्स्टाग्रामवर ‘ब्लँक इमेज’ पोस्ट केला. त्यामध्ये काहीच लिहिलं नव्हतं किंवा कोणाचा फोटोदेखील नव्हता. नंतर काहीतरी नवीन येणार असल्याच्या सईच्या घोषणेने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा असावी किंवा एखादी वेब सीरिज असावी असा अंदाज नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सईच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक यांनी कमेंटमध्ये काही इमोजी पोस्ट केले आहेत. सईची ही घोषणा कशासंदर्भात असू शकते, असा प्रश्न चाहत्यांसोबतच तिच्या सहकलाकारांना पडला आहे.

याआधी सई ‘धुरळा’ या राजकीय कथानकावर आधारित चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात सई साकारलेल्या भूमिकेचं प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगलंच कौतुक झालं. लॉकडाउनदरम्यानही सई सोशल मीडियावर सक्रिय होती. पण अखेर आता तिच्या एखाद्या नव्या प्रोजेक्टची घोषणा होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 8:30 am

Web Title: something new is coming soon posted sai tamhankar ssv 92
Next Stories
1 ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ने गाठला ३०० भागांचा टप्पा
2 ‘जस्टिस फॉर सुशांत’ म्हणणाऱ्या श्वेताने उचललं हे पाऊल; चाहते देखील झाले हैराण
3 रेणुका शहाणे यांनी पहिल्याच चित्रपटात तारक मेहतामधील ‘या’ अभिनेत्यासोबत केले होते काम
Just Now!
X