11 July 2020

News Flash

‘कमाल’च झाली! कारचा अपघात झाल्यानंतरही अभिनेत्याचा मुलगा मागतोय नवीन गाडी

ऑफिसला जात होता आणि त्याने गाडीचा अपघात केला.

बिग बॉसच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेला स्वयंघोषित चित्रपट समिक्षक व अभिनेता कमाल खान नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. परंतु यावेळी केआरके कुठल्याही वादग्रस्त विधानामुळे नव्हे तर त्याच्या मुलामुळे चर्चेत आहे. त्याच्या मुलाने गाडीचा अपघात केला व आता तो नवीन गाडी मागत आहे.

कमालचा मुलगा फैसल ऑफिसला जात असताना त्याने कुठल्याशा गाडीला ठोकर मारली. अशी माहिती स्वत: कमाल खान याने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करुन दिली. त्याने यासंदर्भात माहिती देत अपघात झालेली कार दाखवली. अपघातामध्ये कारचे बरेच नुकसान झालेले स्पष्टपणे दिसते. या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Now #Faisal doesn’t want to drive his #BMW anymore because of the accident. He wants to buy #AudiR8 or #RangeRover! So pls suggest, which one is better? pic.twitter.com/kghSvyLDCr

— KRK (@kamaalrkhan) November 16, 2019

“फैसल ऑफिसला जात होता आणि त्याने गाडीचा अपघात केला. तरीही ठीक  आहे हरकत नाही.” अशा शब्दात कमालने त्याच्या मुलाने केलेल्या प्रतापाची माहिती दिली. यानंतर कमालने आणखी एक ट्विट केले. यात त्याने असे लिहिले की “अपघातामुळे फैसलला आता बीएमडब्ल्यू कार चालवायची इच्छा उरली नाही. आता तो ऑडी R 8 किंवा रेंज रोव्हरची मागणी करतो आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2019 1:37 pm

Web Title: son of this bollywood actor met an accident now demanding rangerover and audi mppg 94
Next Stories
1 इतिहासातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राइकचा तिकीटबारीवर ‘फत्तेशिकस्त’
2 Photo : ‘हे राम’ प्रतापानंतर वाणीने डिलीट केला ‘तो’ फोटो
3 Video : या व्यक्तीच्या आठवणीने प्रशांत दामलेंच्या डोळ्यात आले पाणी
Just Now!
X