26 October 2020

News Flash

#MeToo: आम्ही कधी भेटलोच नाही; सोना मोहपात्राच्या आरोपांवर अनू मलिक यांचं स्पष्टीकरण

सोना मोहपात्राने बुधवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये तिने गायक कैलाश खेर आणि संगीतकार अनू मलिक यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले.

गायिका सोना मोहपात्रा, संगीतकार अनू मलिक

बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेने जोर धरला असून यामध्ये दररोज नवनवीन नावं समोर येत आहेत. नाना पाटेकर यांच्यानंतर कैलाश खेर, दिग्दर्शक विकास बहल, आलोक नाथ, रजत कपूर यांच्यावर लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे आरोप झाले. आता संगीतकार अनू मलिक यांच्यावर गायिका सोना मोहपात्राने आरोप केले आहेत.

सोना मोहपात्राने बुधवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये तिने गायक कैलाश खेर आणि संगीतकार अनू मलिक यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले. ‘ज्या महिला या व्यक्तीशी निगडीत आपले अनुभव सांगत आहेत त्या एकट्या नाहीत. कैलाश खेर या व्यक्तीसारखे बरेच लोक इंडस्ट्रीत आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे अनू मलिक. मी प्रत्येकाविषयी ट्विट नाही करू शकत कारण मी १८ तास काम करते. मी दुसऱ्यांवर टीप्पणी केल्यास अयोग्य ठरेल,’ अशी पोस्ट सोनाने लिहिली होती. अनू मलिकने तिचे हे आरोप फेटाळले आहेत.

#MeToo : आलोक नाथ स्त्रीलंपट, आणखी एका अभिनेत्रीचा आरोप

‘काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेबाबत ती बोलत आहे. त्या घटनेशी माझं काही घेणं-देणं नाही. मी कधीच तिच्यासोबत काम केलं नाही. तरीसुद्धा त्या प्रकरणात सोना माझं नाव मध्येच खेचत आहे. मी तर तिला कधी भेटलोसुद्धा नाही,’ असं स्पष्टीकरण अनू मलिक यांनी दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 5:21 pm

Web Title: sona mohapatra calls anu malik serial predator he says he has not even met her
टॅग MeToo
Next Stories
1 ‘हेलिकॉप्टर इला’ म्हणजे काय रे भाऊ?
2 ‘कन्यापूजेऐवजी मुलींना सॅनिटरी नॅपकिन मशीन देण्याचे समाधान वेगळेच’
3 मद्याच्या अधीन गेल्यानंतर आलोक नाथांचं वेगळं रुप समोर येतं – रेणुका शहाणे
Just Now!
X