News Flash

कपड्यांमुळे ट्रोल करणाऱ्यांवर भडकली सोना मोहापात्रा, म्हणाली…

सध्या तिचे हे ट्विट चर्चेत आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिचे ट्विट सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. आता सोना तिच्या एका म्युझिक व्हिडीओमुळे चर्चेत आहे. नुकताच सोनाने या संदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये लोकं तिला कशा प्रकारे ट्रोल करत आहेत या विषयी तिने सांगितले आहे.

सोनाचा नुकताच ‘हीरे हीरे’ हा म्युझिकल व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने परिधान केलेल्या कपड्यांवरुन तिला ट्रोल केले जात आहे. “सोशल मीडियावरील माझ्या नवीन गाण्याच्या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट करत आहेत. ते कमेंट करत मला सांगत आहेत की मी मीटू चळवळीमध्ये जे काही भाष्य केले त्यावर त्यांचा विश्वास नाही. कारण मी विचित्र कपडे परिधान करते आणि खोटं बोलत आहे असे त्यांना वाटते” अशा आशयाचे ट्विट सोनाने केले आहे.

दुसर्‍या ट्विटमध्ये सोना महापात्रा म्हणाली,”अशा अनेक कमेंट्स मी डिलीट करते किंवा कमेंट करणाऱ्या लोकांना ब्लॉक करते. त्यातल्या काही कॉमेंट्सचे मी स्क्रिनशॉट काढले आहेत. लोकांनी ज्याप्रकारे कमेंट केल्या आहेत त्यातून लोकांना काही कळत नाही असे मला वाटत आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 12:24 pm

Web Title: sona mohapatra shares screenshots of trolles on her clothing and metoo dcp 98 avb 95
Next Stories
1 मिक्का सिंगचा कंगनावर निशाणा, ‘बेटा कंगना, तू करण आणि हृतिक……’
2 बिग बॉस १४मध्ये दोन नव्या स्पर्धकांची एण्ट्री
3 आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलजीतनं एक कोटींची केली मदत, कारण वाचून तुम्हालाही वाटेल आभिमान
Just Now!
X