News Flash

सोनाक्षी सिन्हा झहीरला करतेय डेट?

सलमान खानने सोनाक्षी आणि झहीरची भेट घडवून आणली होती.

सोनाक्षी सिन्हा

बॉलिवूडमध्ये रिलेशनशिप, ब्रेकअप, पॅचअप या गोष्टी काही नवीन नाहीत. सेलिब्रिटींच्या नात्यांची चर्चा कलाविश्वात सतत होतच असते. मलायका अरोरा-अर्जुन कपूर असो किंवा फरहान अख्तर-शिबानी दांडेकर, यांशिवाय आता आणखी एक जोडी चर्चेत आली आहे. ‘दबंग गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एका अभिनेत्याला डेट करत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

सलमान खान निर्मित आगामी ‘नोटबुक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता झहीर इक्बाल आणि सोनाक्षीमध्ये नेमकं काय शिजतंय हा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे या दोघांना एकत्र आणण्यात बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खानचा मोठा वाटा असल्याचं समजतंय. सलमाननेच या दोघांनी भेट करून दिली होती. सल्लू मियाँच्या वाढदिवशी त्याच्या पनवेल इथल्या फार्महाऊसवर जंगी पार्टी झाली. या पार्टीला बॉलिवूडचे बरेच कलाकार उपस्थित होते. या पार्टीला सोनाक्षी आणि झहीर एकाच कारमधून आल्याचं कळतंय.

वाचा : सुशांतवर ‘केदारनाथ’ची कृपा; मिळाले १२ चित्रपटांचे ऑफर्स 

झहीरचे वडील इक्बाल रत्नासी हे सलमाने खास मित्र आहेत. सलमानच्या ‘नोटबुक’मध्ये अभिनेते मोहनिश बहल यांची मुलगी प्रनुतन हिच्यासोबत तो पदार्पण करत आहे. झहीरला काही वर्षांपूर्वी सलमाननं बहिणीच्या लग्नात पाहिलं होतं. झहिरनं लग्नात एक स्टेज परफॉर्मन्स केला होता. भाईजानला तो इतका आवडला की पुढच्या चित्रपटात झहीरलाच संधी द्यायची असं त्यानं पक्कं केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 1:34 pm

Web Title: sonakshi sinha and zaheer iqbal are the new lovebirds in b town
Next Stories
1 ना कलाकार ओळखू येतोय ना भूमिका; मोदींच्या बायोपिकवरून विवेक पुन्हा ट्रोल
2 बोनी कपूरच्या मुलांचा या नावाने व्हॉटसअॅप ग्रुप
3 सुशांतवर ‘केदारनाथ’ची कृपा; मिळाले १२ चित्रपटांचे ऑफर्स
Just Now!
X