काही दिवसापूर्वी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात वाल्मिकी समाजाविषयी जातिवाचक वक्तव्य केलं होतं. तिच्या या वक्तव्यानंतर ती वादात सापडली असून तिने वापरलेल्या शब्दामुळे वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यात सोनाक्षीचा फोटो जाळून निषेध करण्यात आला होता. या प्रकारानंतर सोनाक्षीने जाहीरपणे वाल्मिकी समाजाची माफी मागितली आहे.

सोनाक्षीने केलेल्या जातिवाचक वक्तव्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. या साऱ्या प्रकारानंतर सोनाक्षीने सोशल मीडियावर जाहीरपणे माफी मागितली आहे. सोनाक्षीने हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेत पोस्ट लिहून ही माफी मागितली आहे. ‘जाणूनबुजून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता’, असं सोनाक्षीने म्हटलं आहे.

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
Raj Thackeray Padwa melava
“राज ठाकरे ठरवतील तीच धर्माची बाजू असेल”, मनसेच्या वरिष्ठ नेत्याची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले…
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

“२३ जुलै रोजी सिद्धार्थ कानन यांनी दिलेल्या मुलाखतीत वाल्मिकी समाजाविषयी मी चुकून एक वक्तव्य केलं. मात्र मला कोणाच्याही भावना दुखावायचा नव्हता. या समाजाप्रति माझ्या मनात प्रचंड सन्मान आणि आदर आहे. या समाजाने देशासाठी अमूल्य योगदान दिलं आहे. मी केलेल्या वक्तव्यामुळे या समाजातील कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावलं गेलं असेल तर मी त्यांची माफी मागते”, असं सोनाक्षी म्हणाली.

दरम्यान, सोनाक्षी सिन्हाने ‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात वाल्मिकी समाजाविषयी जातिवाचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सोनाक्षीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. सोनाक्षीच्या आगामी ‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटात  लैंगिक समस्येवर एका अनोख्या पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे. दरम्यान चित्रपटात अभिनेता वरुण सोनाक्षीच्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे.