News Flash

‘आग लगे बस्तीमें……’ म्हणत सोनाक्षी सिन्हाने डीअ‍ॅक्टीव्हेट केलं ट्विटर अकाऊंट

नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी उचललं पहिलं पाऊल

फोटो सौजन्य-सोनाक्षी सिन्हा इंस्टाग्राम अकाऊंट

आग लगे बस्तीमें मै अपनी मस्तीमें असं म्हणत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचं ट्विटर अकाऊंट डीअ‍ॅक्टीव्हेट केलं आहे. आपण आपलं ट्विटर अकाऊंट डीअ‍ॅक्टीव्हेट केल्याची माहिती सोनाक्षीने इंस्टाग्रामवर दिली आहे.

नेमकं काय म्हणाली सोनाक्षी सिन्हा
नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी पहिलं पाऊल मी उचलते आहे. माझं पावित्र्य मी राखणार आहे. त्यामुळे ट्विटरवरुन निरोप घेते आहे. चला तर मग मी माझं ट्विटर अकाऊंट डीअ‍ॅक्टीव्हेट करते आहे. बाय.. पिस आऊट! आग लगे बस्तीमें.. मै अपनी मस्तींमे.. बाय ट्विटर!

सोनाक्षी सिन्हाची इंस्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

Aag lage basti mein… mein apni masti mein! Bye Twitter

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on

बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात सक्रिय आहे. ट्विटरवरही ती चांगलीच अ‍ॅक्टीव्ह होती. मात्र अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. ज्यानंतर सोनाक्षी सिन्हाने एक ट्विट केलं. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. या ट्रोलिंगनंतर सोनाक्षीने तिचं ट्विटर अकाऊंट डीअ‍ॅक्टीव्हेट केलं. याबद्दलची माहिती तिने इंस्टाग्रामवर दिली.

१४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने त्याच्याबद्दल एक ट्विट केलं होतं. या ट्विटवरुन नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं. अखेर सोनाक्षी सिन्हाने तिचं ट्विटर अकाऊंट डीअॅक्टीव्हेट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 7:44 pm

Web Title: sonakshi sinha deactivates twitter account aag lage basti mein main apni masti mein scj 81
टॅग : Sonakshi Sinha
Next Stories
1 “बिंग ह्युमन संस्थेआड होतात आर्थिक गैरव्यवहार”; अभिनव कश्यपचा धक्कादायक आरोप
2 सलमानला पाठिंबा देत चाहत्यांचे तीन लाखांपेक्षा जास्त ट्विट
3 सुशांतनं ‘यश राज’सोबत केलेलं करारपत्र मुंबई पोलिसांना मिळाले; १५ जणांची चौकशी
Just Now!
X