News Flash

सोनाक्षीचे ऑस्ट्रेलियात स्कूबा डायव्हिंग

सोनाक्षीने ऑस्ट्रेलियन समुद्रात स्कूबा डायव्हिंगचा आनंद लुटला.

सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हाला आपण ब-याच ठिकाणांना भेट देऊन काहीतरी वेगळं करताना पाहिले आहे. अभिनेता जॉन अब्राहमसोबतच्या ‘फोर्स-२’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या सोनाक्षीने नुकतेच ऑस्ट्रेलियात असाच एक आगळा वेगळा थरार अनुभवला. सोनाक्षीने ऑस्ट्रेलियन समुद्रात स्कूबा डायव्हिंगचा आनंद लुटला. स्कूबा डायव्हिंग करतानाचा फोटो देखील तिने यावेळी टीपला. पाण्याखालील सौंदर्य टिपण्यासाठी सोनाक्षीने खास कॅमेरा विकत घेतला होता.

सोनाक्षीने काही फोटोंचे कोलाज ट्विटवर शेअर केला असून, स्कूबा डायव्हिंगचा हा थरारक अनुभव आनंददायी देणारा ठरला, अशी प्रतिक्रिया सोनाक्षीने दिली. तिने स्टार फिशसोबत काढलेला फोटोसुद्दा ट्विटवर शेअर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2016 10:08 am

Web Title: sonakshi sinha goes scuba diving in australia
टॅग : Sonakshi Sinha
Next Stories
1 विद्या बालन म्हणते.. ‘बॉलीवूडमध्ये असुरक्षित वाटते!’
2 शब्दच नसतील तर त्याला गाणे कसे म्हणायचे-आशा भोसले
3 चित्रपटात सायनाची भूमिका साकारायला आवडेल- दीपिका पदुकोण
Just Now!
X