News Flash

सुशांतच्या आत्महत्येवर सोनाक्षीने केले ट्विट, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. नुकताच सोनाक्षीने बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर ट्विट केले. या ट्विटमुळे तिला पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

सोनाक्षीने ट्विटमध्ये एका प्राण्याचे उदाहरण दिले आहे. ‘एखाद्या प्राण्याशी लढण्यासाठी आपल्याला चिखलात उतरावे लागते. त्यामुळे आपले कपडे खराब होतात आणि तो प्राणी त्या चिखलात मजा घेत असतो ही सर्वात मोठी समस्या आहे’ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.

सोनाक्षीने हे ट्विट करताच तिला सोशल मीडियावर मोठ्य प्रमाणावर ट्रोल करण्यात आले.

एका यूजरने तिला, आता सत्य बाहेर येत आहे तर यांना त्रास होत आहे. तर दुसऱ्या एका यूजने किती चुकीचे ट्विट केले आहे असे म्हणत सुनावले आहे. सध्या सोशल मीडियावर सोनाक्षीला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 5:51 pm

Web Title: sonakshi sinha got trolled over comment on sushsnat singh rajput suicide avb 95
Next Stories
1 आगळ्यावेगळ्या कथानकाचा ‘बबली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2 मराठी ‘झॉलीवूड’चा विदेशात डंका; सातासमुद्रापार पटकावला पुरस्कार
3 “सुशांतच्या आत्महत्येबाबत कळताच अंकिताला फोन लावला आणि..”; प्रार्थना बेहरेनं व्यक्त केल्या भावना
Just Now!
X