News Flash

अटकेच्या व्हिडीओवर सोनाक्षी सिन्हा म्हणते…

या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर #AsliSonaArrested हा हॅटटॅग जोरदार ट्रेण्ड होत आहे

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील आघाडीची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सोनाक्षीला अटक करून घेऊन जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान ‘तुम्ही मला अटक करु शकत नाही. तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही मला असं कसं अटक करु शकता?’ असे सोनाक्षी बोलताना दिसत आहे.

या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर #AsliSonaArrested हा हॅटटॅग जोरदार ट्रेण्ड होत आहे. परंतु या सर्व चर्चांना पूर्णविराम लावण्यासाठी अखेर सोनाक्षीला काय घडले हे सांगावे लागले आहे. सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटद्वारे नक्की काय घडले आहे याचा खुलासा केला आहे. ‘हॅलो मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर माझ्या अटकेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. परंतू हे संपूर्ण सत्य नाही. मी घटनेचा लवकरच खुलासा करणार आहे’ असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.

हा व्हिडीओ एका ब्रॅन्डच्या प्रमोशनचा भाग असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या सोनाक्षी तिचा आगामी चित्रपट ‘मिशन मंगल’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नी, सोनाक्षी, शर्मन जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान या चित्रपटात मंगळ मोहिमेची योजना आखण्यापासून ती यशस्वी करण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओ आणि केप ऑफ गुड फिल्म मिळून केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 1:52 pm

Web Title: sonakshi sinha open up about his arrested video avb 95
Next Stories
1 तुम्ही संकटात असताना नाटकाचा प्रयोग करणं योग्य नाही- सुबोध भावे
2 स्टिव्हन स्पिलबर्ग व लिओनार्दो दी कॅप्रिओ यांचा ‘ग्रँट’ सिनेमा
3 ‘तुमच्यासारख्या रसिकांमुळे आम्हाला नाटक करण्याचं बळ येतं’
Just Now!
X