01 October 2020

News Flash

सोनाक्षी तू बिकनी कधी घालणार?, ट्विटरवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाने ‘दबंगगर्ल’ संतप्त

ट्विट्सच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना तिचे रोजचे अपडेट्स देत असते.

सोनाक्षीने टवाळ ट्विटरकराला सुनावले.

असभ्य ट्विट केलेल्या एका नेटिझनला बॉलीवूडची ‘दबंगगर्ल’ सोनाक्षी सिन्हाने धारेवर धरले. सोनाक्षी तू बिकिनी कधी घालणार? असा प्रश्न एका ट्विटरकराने सोनाक्षीला विचारला होता. त्यावर संतप्त झालेल्या सोनाक्षीने तुझ्या आई-बहिणीला हा प्रश्न विचार आणि त्यांचे काय म्हणणे आहे ते मला सांग, असे सडेतोड उत्तर दिले.
सोनाक्षी ट्विटर अकाऊंटवर नेहमी सक्रीय असते. ट्विट्सच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना तिचे रोजचे अपडेट्स देत असते. दिनक्रमानुसार सोनाक्षीने ‘इट्स टाइम फॉर शूट’ असे ट्विट केले होते. त्यावर तिच्या एका फॉलोअरने ‘सोनाक्षी तू अंगप्रदर्शन कधी करणार, तू बिकिनी कधी घालणार?’, असा प्रश्न विचारला. त्यावर सोनाक्षीने या असभ्य ट्विटचे स्क्रिनशॉट काढून पोस्ट केले आणि टवाळखोर ट्विटरकराचा चांगलाच समाचार घेतला. तुझ्या आई-बहिणीला हा प्रश्न विचार, असा रिप्लाय सोनाक्षीने दिला.
दरम्यान, संबंधित तरुणाने माफी मागितल्याने प्रत्युत्तरादाखल आपण केलेले ट्विट मागे घेत असल्याचे सोनाक्षीने ट्विटवर जाहीर केले आहे. तसेच माझ्या प्रत्युत्तरातून महिलांचा सन्मान न करणाऱया नेटिझन्सला चांगला धडा मिळाला असेल यापुढे असे ट्विटर मला किंवा इतर कोणत्याही महिलेला उद्देशून होणार नाहीत, अशी आशा देखील तिने व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2016 9:38 am

Web Title: sonakshi sinha shames a shameless twitter troll
Next Stories
1 पाहाः ‘द जंगल बुक’चा ट्रेलर
2 अनुष्काने लगावली सलमानच्या कानशिलात!
3 REVEALED: शाहीन होती सलमान खानचे पहिले प्रेम!
Just Now!
X