News Flash

रज्जोचा दबंग लूक!, खाकी वर्दीतील सोनाक्षी सिन्हाचा दमदार अंदाज

महिला दिनाच्या निमित्तानं केली घोषणा

जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने प्रेक्षकांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केलीय. सोनाक्षीने तिचा एक दमदार लूकमधला फोटो शेअर करत डिजिटल पदार्पण करत असल्याचं जाहीर केलंय. सोनाक्षी लवकरच अ‍ॅमेझॉन प्राईमवरील एका वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती एका महिला पोलिसाची भूमिका साकारताना दिसून येणार आहे.

या वेब सीरिजमधील सोनाक्षीचा लूक तिने चाहत्यांसोबत शेअर केलाय. सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खाकी वर्दीतील फोटो पोस्ट करत महिलाशक्ती वर भाष्य केलंय. सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोत ती पोलिसांच्या वर्दीत उभी दिसतेय. रेल्वे रुळांच्या पटरीजवळ ती दंबग अंदाजात उभी आहे. या फोटोतील तिच्या नजरेचा रोख तिच्या भूमिकेविषय बरचं काही सांगून जातो. या फोटोवरुन ती एका धडाकेबाज पोलिसाच्या रुपात पाहायला मिळणार हे लक्षात येतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

फोट शेअर करत सोनाक्षीने म्हंटल आहे ” महिला काय साध्य करु शकतात त्याला मर्यादा नाही. यात आपल्या सर्वांचा विश्वासच आहे की जो काळासोबत आणखी प्रबळ होत चालला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही एक पायरी वर चढत आहोत….मुली कश्याप्रकारे हे साध्य करतात हे दाखवण्यासाठी उत्सुक आहोत.” असं कॅप्शन सोनाक्षीने तिच्या फोटोला दिलं आहे.

सोनाक्षी सिन्हा सोबतच या वेब सीरिजमध्ये अभिनेता विजय वर्मा, गुलशन देवया आणि सोहम शहा यांच्या प्रमुख भूमिका असतील. रिमा कागती आणि रुचिका अग्रवाल यांनी या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलंय. अद्याप तरी या वेब सीरिजचं नाव आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

या वेब सीरिजमधून प्रेक्षकांना सोनाक्षीचा दमदार अंदाज पाहायला मिळणार आहे. यासोबतच सोनाक्षी अजय देवगणच्या ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमादेखईल ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 9:23 am

Web Title: sonakshi sinha shares her look from upcoming web series on amazon prime kpw 89
Next Stories
1 कॉमेडियन सुनील ग्रोव्हरच्या स्वयंपाक घरातून माकडाने केली चोरी, व्हिडीओ व्हायरल
2 बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठाच्या बर्थडे पार्टीला श्रद्धा कपूरने लावली हजेरी
3 ‘जॉबलेस’ सीरिजच्या शूटिंगचा श्रीगणेशा
Just Now!
X