18 January 2019

News Flash

‘आपला मानूस’च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार ‘ही’ अभिनेत्री?

आशुतोष गोवारीकर करणार हिंदी रिमेकचं दिग्दर्शन

'आपला मानूस'च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार 'ही' अभिनेत्री?

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘आपला मानूस’ या चित्रपटाला प्रेक्षक- समीक्षकांकडून दाद मिळाली. आता दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर नाना पाटेकरांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. हिंदी रिमेकमध्ये करिना कपूरला विचारण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. मात्र तिने नकार दिल्याने आता सोनाक्षी सिन्हाला या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी विचारण्यात येत आहे.

‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार करिनाने राज मेहताच्या एका चित्रपटाची ऑफर स्विकारली आहे. ज्यामध्ये ती अक्षय कुमारसोबत भूमिका साकारणार आहे. त्यामुळे तारखा जुळत नसल्याने करिनाने ‘आपला मानूस’च्या हिंदी रिमेकला नकार दिला आहे. त्यामुळे आता निर्मात्यांनी आपला मोर्चा सोनाक्षीकडे वळवला आहे. सोनाक्षीसोबत या भूमिकेविषयी बोलणं झालं असून निर्माते तिच्या होकाराच्या प्रतीक्षेत आहेत.

वाचा : अरमान कोहलीच्या गर्लफ्रेंडने घेतली तक्रार मागे

मराठी चित्रपटात नाना पाटेकरांसोबतच सुमित राघवन आणि इरावती हर्षे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. बॉक्स ऑफीसवर ‘आपला मानूस’ने चांगली कमाई केली असून अनेकांनीच त्याची स्तुती केली. त्यामुळे याचा हिंदी रिमेक सोनाक्षीच्या करिअरमधला महत्त्वाचा चित्रपट ठरू शकतो, असं म्हटलं जात आहे.

First Published on June 13, 2018 6:43 pm

Web Title: sonakshi sinha steps in after kareena kapoor khan opts out of nana patekar apla manus hindi remake