तुम्ही सोनाक्षी सिन्हाचा आगामी ‘अकिरा’चा ट्रेलर पाहिलाच असेल. यात ती पूर्ण दबंगगिरी करताना दिसत आहे. झाडांच्या मागे हिरोबरोबर फिरण्यापेक्षा ती आता पुरुषांबरोबर दोन हात करताना दिसत आहे. एआर मुर्गदास दिग्दर्शित हा एक अॅक्शन ड्रामा पट आहे. ‘अकिरा’ सिनेमाच्या पोस्टरवर ‘नो वन विल बी फरगिव्हन’ अशी टॅगलाइन आहे. भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांवर सोनाक्षीचा एक एक पंच भारी पडताना ट्रेलरमध्ये दिसतो आहे. पण सिनेमातल्या प्रत्येक पंचसाठी तिने तेवढीच मेहनत घेतली आहे. ती या व्यक्तिरेखेसाठी घेत असलेली मेहनत व्हिडिओ फॉक्स स्टारने रेकॉर्ड केला आहे. ‘अकिरा’मध्ये राजस्थानमधून मुंबईत आलेल्या मुलीची कथा सांगण्यात आली आहे.
‘अकिरा’मध्ये सोनाने अकिरा नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘अकिरा’ जोधपूरवरून मुंबईला शिकायला येते आणि अचानक कॉलेजमधील एका आत्महत्या प्रकरणात तिला गोवण्याचे प्रयत्न होतो. पण अकिरा भ्रष्ट व्यवस्था आणि भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध उभी राहते. ट्रेलरमधील सोनाचा अॅक्शन अवतार जितका पाहण्यासारखा आहे, तितकेच या व्हिडिओतील अकिराचे पंचही पाहण्यासारखे आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 21, 2016 5:04 pm