News Flash

पत्रकार सोनाक्षी सिन्हा!

आपल्या अॅक्शन सीन्सने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सर्वांना चकित केले आहे.

'नूर' हा चित्रपट पुढील वर्षी २१ एपिलला प्रदर्शित होईल.

आपल्या अॅक्शन सीन्सने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सर्वांना चकित केले आहे. ‘अकिरा’ आणि ‘फोर्स २’ या चित्रपटांमध्ये सोनाक्षीचा खरा दबंग लूक पाहावयास मिळाला. त्यानंतर आता लवकरच ती ‘नूर’ या चित्रपटात दिसणार असून नुकताच त्याचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श आणि सोनाक्षी सिन्हाने चित्रपटाचा हा पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित केला.

‘नूर’च्या पोस्टरमध्ये सोनाक्षीचा गंभीर स्वरुपातील लूक पाहावयास मिळतो. या चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसेल. पोस्टरच्या खाली सोनाक्षीचे दोन वेगवेगळे लूक दाखविण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘फोर्स २’ चित्रपटात सोनाक्षीने रॉ एजन्टची भूमिका साकारली होती. नोटाबंदी असूनही या चित्रपटाने केवळ चार दिवसांत तब्बल २१ कोटींचा गल्ला जमवला आहे. यात साहसी दृश्य साकारणारी सोनाक्षी लवकरच बातम्या देताना आणि गुंतागुतीचे प्रसंग हाताळताना दिसेल.

सोनाक्षीचा हा चित्रपट आधी ७ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणास्तव चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. चित्रपटात महिला पत्रकाराच्या भूमिकेत दिसणारी सोनाक्षी पाकिस्तानात झालेल्या स्फोटांनंतर तेथे जाऊन बातम्या देताना दिसेल. यात तिला मृत शरिरं आणि धक्का देणारी दृश्ये पाहावी लागणार आहेत. त्या दरम्यान ती एका योग्य जोडीदाराचाही शोध घेताना दिसेल. चित्रपटाचा पोस्टर ट्विट करत सोनाक्षीने म्हटले की, ‘ती सकाळची असं किरण आहे जी वादळात मिसळलीय. ती प्रत्येक मुलीत आहे. ती नूर आहे.’

‘नूर’ हा चित्रपट पुढील वर्षी २१ एपिलला प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 7:13 pm

Web Title: sonakshi sinhas noor to release on april 21
Next Stories
1 पाच वर्षांनंतर सनी लिओनी पुन्हा दिसणार बिग बॉसच्या घरात
2 ‘बाहुबली २’ चित्रपटातील दृश्य लीक केल्याप्रकरणी एकाला अटक
3 VIDEO: रजनीकांतने राखी सावंतला म्हटले बॉलीवूडची क्वीन
Just Now!
X