News Flash

समाजसेवेसाठी सोनाक्षीने काढलेल्या चित्राचा लिलाव..

'ब्रेस्ट कॅन्सर' विषयी जनजागृति मोहिम चालवण्यात येणार आहे

छाया सौजन्य- ebay India

‘अकिरा’ या अॅक्शन पटाच्या निमित्ताने सध्या प्रचंड चर्चेत असणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या या चित्रपटात तिने गायलेल्या गाण्यासाठीही बरीच गाजत आहे. अभिनय, गायन, मार्शल आर्ट्स या सर्व कला शिकलेली सोनाक्षी सिन्हा एक चांगली चित्रकारही आहे. याच चित्रकलेच्या आवडीतून सोनाक्षीने एक चित्र साकारत त्याचा वापर समाजसेवेसाठी करण्याचे ठरवले आहे. सोनाक्षीने काढलेल्या या चित्राचा ‘इ बे’ या संकेतस्थळाद्वारे लिलाव करण्याचे ठरवले आहे. या लिलावाबद्दल खिलाडी अक्षय कुमार यानेही ट्विट केले आहे.
ओगान कॅन्सर फाउंडेशन मार्फत ‘ब्रेस्ट कॅन्सर’च्या उपक्रमाला मदत करण्यासाठी सोनाक्षीने हे पाऊल उचलले आहे. सोनाक्षीने साकारलेल्या या चित्राच्या लिलावाला चांगला प्रतिसाद मिळत असून हा लिलाव आठवडाभरासाठी चालणार आहे अशी माहिती सुत्रांमार्फत मिळत आहे. कर्करोगाविषयीच्या या उपक्रमाअंतर्गत फक्त आर्थिक मदतच करण्यात येणार नसून ‘ब्रेस्ट कॅन्सर’ विषयी जनजागृति मोहिमही चालवण्यात येणार आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या ‘अकिरा’ चित्रपटासाठी बरीच उत्सुक आहे. या चित्रपटात सोनाक्षी मार्शल आर्ट, स्टंट्स करताना दिसणार आहे. ए. आर. मुर्गदास दिग्दर्शित हा चित्रपट २ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 3:09 pm

Web Title: sonakshi sinhas painting to be auctioned on ebay
Next Stories
1 लांबलचक चर्चेनंतर शेवटी जीएसटी पास झाले – बिग बी
2 टीम इंडियासाठी ‘ढिशूम’चे स्पेशल स्क्रिनिंग
3 VIDEO: ‘काला चष्मा’चे गुजराती व्हर्जन व्हायरल
Just Now!
X