News Flash

सोनाक्षी ‘दाऊद’ची बहिण!

गेल्यावर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेली दाऊदची बहिण हसीना पारकर हिच्यावर चित्रपट काढण्यात येणार आहे.

| August 3, 2015 12:39 pm

गेल्यावर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेली दाऊदची बहिण हसीना पारकर हिच्यावर चित्रपट काढण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे हसीनाची भूमिका साकारणार आहे बॉलीवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा.
दक्षिण मुंबईतील दाऊदची बेनामी मालमत्ता सांभाळणाऱ्या हसीना हिचा ‘दाऊदची बहीण’ म्हणून दबदबा होता़. नागपाडा येथील आलिशान ‘गॉर्डन हाऊस’मध्ये वास्तव्याला असलेल्या हसीनाचा गेल्यावर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ती दाऊदच्या सर्वात जवळ होती तसेच, तिची जीवनकथाही रंजक असल्याने दिग्दर्शक अपूर्व लाखिया तिच्या जीवनावर ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ हा चित्रपट काढत आहे. याविषयी एका वृत्तपत्राने माहिती दिली असून, सोनाक्षीने त्याला दुजोरा दिला आहे. सोनाक्षी म्हणाली की, या चित्रपटाची कथा खूप छान आहे. एक रहस्यमयी कथा असून शक्तिशाली भूमिका करण्याची संधी मला मिळतेयं. मला बायोपिक करण्याची खूप इच्छा होती. हसीना पारकर यांचे व्यक्तिमत्व हे माझ्यापेक्षा खूप वेगळं आहे. त्यामुळे एक आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मला मिळत आहे.
‘वन्स अपॉन टाइम इन दोबारा’ या दाऊदवर आधारित चित्रपटातही सोनाक्षीने भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2015 12:39 pm

Web Title: sonakshi will play dawoods sister haseena parkars role
टॅग : Sonakshi Sinha
Next Stories
1 पोलिसाला ‘ठुल्ला’ म्हटल्याने आमीरविरुद्ध तक्रार
2 थेट रूपेरी पडदा!
3 मनोरंजन..
Just Now!
X