News Flash

BIRTHDAY SPECIAL : कर्करोगावरही मात करणाऱ्या सोनालीचा प्रेरणादायी प्रवास

'आग' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

सोनाली बेंद्रे

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा आज १ जानेवरी रोजी वाढदिवस. चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ती मॉडेल होती. वयाच्या १९ व्या वर्षी सोनालीने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. तिने १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डमध्ये ‘न्यू फेस ऑफ द इअर’ हा अवॉर्ड देण्यात आला होता.

सोनाली खरी ओळख १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिलजले’ या चित्रपटाने मिळवून दिली होती. या चित्रपटात सोनालीसह अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर सोनालीने सुनील शेट्टीसोबत ‘भाई’, आमिर खानसोबत ‘सरफरोश’ आणि शाहरुखसोबत ‘डुप्लीकेट’ हे हिट चित्रपट दिले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. पण काही काळ सोनाली चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. पण २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’मध्ये पाहुण्या कालाकाराची भूमिका साकारुन तिने बॉलिवूडमध्ये पुनारागमन केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on

२०१८ मध्ये सोनालीला कर्करोगाचा सामना करावा लागला होता. कर्करोगावर उपचार घेण्यासाठी सोनाली न्यूयॉर्कला गेली होती. दरम्यान तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना प्रकृतीची माहिती दिली. कॅन्सर झाल्याची माहिती देखील तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. काही दिवसानंतर सोनाली कर्करोगावर मात करुन पुन्हा भारतात परतली. सोनालीने या काळातले बरेच फोटो शेअर केले. या फोटोमध्येदेखील ती सुंदर दिसत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 10:16 am

Web Title: sonalee bendre debut from this movie in bollywood avb 95
Next Stories
1 नाना पाटेकर एकेकाळी दिवसाला ओढायचे आठ सिगारेट
2 …तरच मी अवॉर्ड शोला हजर राहिल; रोहित शेट्टीची अशीही अट
3 मावळत्या दशकात ‘या’ सिनेमांनी उमटवला ठसा
Just Now!
X