11 November 2019

News Flash

अप्सरा होणार ‘लेडी सिंघम’?

सोनालीच्या पोस्टवरून आगामी चित्रपटात ती 'महिला पोलीस अधिकारी' ही भूमिका साकारत असावी असं दिसतंय.

सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायमच आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांना भुरळ पाडत असते. ‘नटरंग’ चित्रपटानंतर प्रकाशझोतात आलेली ही अभिनेत्री लवकरच एका वेगळ्या धडाकेबाज भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं दिसत आहे. सोनालीने तिच्या फेसबुक अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टवरून कदाचित ती आगामी चित्रपटात ‘महिला पोलीस अधिकारी’ ही भूमिका साकारत असावी असं दिसतंय.

अनेक कार्यक्रमांमधून आणि चित्रपटांमधून सोनालीने आपले अभिनय आणि नृत्यकौशल्य दाखवले आहे. ‘नटरंग’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मितवा’ अशा सुपरहिट मराठी चित्रपटांसोबतच सोनालीने हिंदीतही आपली छाप पाडली आहे. ‘ग्रँड मस्ती’, ‘सिंघम’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. सोनालीने नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट केली असून त्या पोस्टमधील फोटोंमध्ये सोनाली सशक्त महिला पोलीस अधिकारी दिसत आहे. ‘मला कायमच ही वर्दी घालायची होती. वर्दी घालून गुन्हेगारांना योग्य शिक्षा देणं ही माझी इच्छा होती जी आता पूर्ण झाली आहे. हे सगळं करतांना खूप मजा आली. ही बातमी तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’ असं सोनालीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सोनालीच्या चाहत्यांनी या पोस्टवर सकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. पोस्टसोबतच सोनालीने ‘नेचर डिलाइट’,’लेडीकॉप’असे हॅशटॅग वापरले आहेत.

First Published on May 21, 2019 2:22 pm

Web Title: sonalee kulkarni about to perform lady cop