चित्रपट क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करण्याचा ध्यास घेतलेले वायाकॉम१८ मोशन पिक्चर्स आता मराठी चित्रपट क्षेत्रात एक वेगळा प्रयोग करू पाहत आहे. निमित्त आहे वायाकॉम१८ मोशन पिक्चर्सचा आगामी मराठी चित्रपट ‘पोश्टर गर्ल’. हा सिनेमा समाजातले एक व्यंग मनोरंजक पद्धतीने मांडणार आहे.
poshter-girl-1
सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, हृषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव आणि सिद्धार्थ मेनन या प्रथितयश कलाकारांनी या चित्रपटात वर्णी लावली आहे. समीर पाटील या सिनेमाचे दिग्दर्शन करीत असून संगीताची धुरा प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी सांभाळली आहे. महाराष्ट्राच्या एका अतरंगी गावात घडत असलेली समकालीन कथा म्हणजे ‘पोष्टर गर्ल’. दिग्दर्शक समीर पाटील याविषयी म्हणाला की, “माझ्या  दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती वायाकॉम१८ मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनाये  करत असल्याबद्दल मी खूप समाधानी आहे. या संधीमुळे एकीकडे आनंद तर आहेच पण त्याच बरोबरच जबाबदारी वाढल्याची देखील मला जाणीव आहे.”
यापूर्वी समीर पाटील दिग्दर्शित ‘पोश्टर बॉइज’ चित्रपटाची श्रेयस तळपदेने निर्मिती केली होती.