26 October 2020

News Flash

‘ही तुमची अप्सरा नाही’ म्हणत सोनालीने सांगितला नैराश्याचा अनुभव

चित्रपटसृष्टीत काम करत असाल तर तुमच्या सौंदर्याला विशेष महत्त्व असतं.

सोनाली कुलकर्णी

तुम्ही चित्रपटसृष्टीत काम करत असाल तर तुमच्या सौंदर्याला विशेष महत्त्व असतं. चांगलं दिसण्यासाठी हे कलाकार विविध उपाय करत असतात. अगदी काहीजण प्लास्टिक सर्जरीसुद्धा करतात. पण तुम्ही जसे आहात तसं स्वीकारायला पाहिजे, असा संदेश मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देतेय. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणाऱ्या सोनालीने नुकताच तिचा विनामेकअप सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला. यासोबतच तिने सुंदरतेची एक नवीन परिभाषा चाहत्यांसमोर मांडली.

‘ही मी आहे. तुमची ऑनस्क्रीन अप्सरा नाही. तरीसुद्धा मी स्वत:वर खूप प्रेम करते. माझी त्वचा जन्मत:च नितळ होती. मात्र नटरंग या चित्रपटानंतर मला पिंपल्सचा त्रास जाणवू लागला. अनेक मुलींना हा त्रास जाणवतो. त्यामुळे मी बरेच ऑफर्ससुद्धा गमावले. मी नैराश्याच्या गर्तेत अडकले होते. पण जेव्हा तुम्ही स्वत:ला जसे आहात तसे स्वीकारता, तेव्हा या समस्या तुम्हाला फार त्रास देत नाहीत. तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर ठीक आहे. ते नाही लपवले तरी ठीक आहे. फक्त स्वत:वर प्रेम करायला शिका’, अशी पोस्ट तिने या फोटोसोबत लिहिली.

सोनालीने तिच्या नैराश्याबाबत आणि त्वचेच्या समस्येबाबत खुलेपणाने सांगितलं, याबद्दल नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं. तर तुझ्या या पोस्टमुळे मला प्रेरणा मिळाली, असं म्हणत काहींनी तिची प्रशंसा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 1:36 pm

Web Title: sonalee kulkarni openly talks about acne issues ssv 92
Next Stories
1 करोनामुळे आली अभिनेत्रीवर कपडे धुण्याची वेळ; कपडे तुडवून व्यक्त केला राग
2 Coronavirus : जगभरातील कलाकार एकत्र; ‘डब्ल्यूएचओ’ला करणार आर्थिक मदत
3 करोनापासून कसे तरी वाचू, पण…; अभिनेत्याला छळतोय एक प्रश्न
Just Now!
X