News Flash

पुढच्या वर्षी होणार मिसेस… सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट

होणाऱ्या पतीसोबतचे फोटो केले पोस्ट

सोनाली कुलकर्णी, कुणाल बेनोडेकर

मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये विवाहबद्ध होणार आहे. होणाऱ्या पतीसोबतचे खास फोटो पोस्ट करत सोनालीने दिवाळीनिमित्त खास पोस्ट लिहिली आहे. २०१८ मधील हे फोटो आहेत. अभिनेता सुबोध भावेच्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी सोनाली तिचा होणारा पती कुणाल बेनोडेकरसोबत पुण्याला आली होती.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनालीनं लिहिलंय, ‘पुढच्या वर्षी मिसेस होऊन तुमच्यासमोर येणार’. २ फेब्रुवारी २०१९ रोजी सोनाली आणि कुणालचा दुबईत साखरपुडा पार पडला. त्यानंतर १८ मे रोजी वाढदिवशी सोनालीने तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांना सांगितली. कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. सोनालीने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केली नाही. लग्नानंतर ती दुबईत स्थायिक होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप सोनालीने काही अधिकृत माहिती दिली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

कोण आहे सोनालीचा होणारा पती?
कुणाल बेनोडेकर असं तिच्या होणाऱ्या पतीचं नाव आहे. ‘केनो’ या नावानेही त्याची ओळख आहे. कुणालचं शिक्षण लंडनमधल्या ‘मर्चंट्स टेलर स्कूल’मध्ये झालं. त्यानंतर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’मधून त्याने उच्च शिक्षण घेतलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 8:49 am

Web Title: sonalee kulkarni posted throwback diwali pictures with fiance kunal benodekar ssv 92
Next Stories
1 देवासोबत होतेय सोनू सूदची पूजा; चाहत्यांचं प्रेम पाहून अभिनेता झाला भावूक
2 ‘माझ्या मुलानं भारतात काम करु नये’; सोनू निगमनं केलं वादग्रस्त वक्तव्य
3 याला म्हणतात खरा राउडी; धनुषचं ‘हे’ गाणं १०० कोटी वेळा पाहिलं गेलं
Just Now!
X