10 July 2020

News Flash

“आम्ही रस्त्यावर पडलेल्या मुली नाही”; लग्नाविषयीच्या चर्चांवरून ट्रोल करणाऱ्यांना सोनालीने सुनावलं

कुणाल बेनोडेकर याच्याशी लग्न करणार असल्याची चर्चा असतानाच सोशल मीडियावर तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.

सोनाली कुलकर्णी

मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला. प्रियकर कुणाल बेनोडेकर याच्याशी लग्न करणार असल्याची चर्चा असतानाच सोशल मीडियावर तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. या ट्रोलर्सना सोनालीने खडेबोल सुनावले आहेत.

‘पिपिंगमून मराठी’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सोनाली म्हणाली, “अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या. पण त्यात असेही अनेकजण होते, ज्यांनी माझ्यावर टीका केली. अमूक राजकारण्याशी माझं लग्न झाल्याचं त्यांनीच ठरवलं आणि तशी कमेंट केली. ते तुटलं वाटतं, हे नवीन आहे वाटतं, अशा संतापजनक कमेंट्स होत्या. तुम्हाला जर पार्श्वभूमीच माहित नाही तर उठसूठ फक्त वायफाय आहे, हातात मोबाईल आहे म्हणून वाटेल ते लिहायचं का? अभिनेत्री तुम्हाला एखाद्या वस्तूप्रमाणे वाटतात. हे फार चुकीचं आहे. कमेंट करण्यापूर्वी किमान वस्तूस्थिती काय आहे, पार्श्वभूमी काय आहे हे तरी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आमच्याबद्दल वाटेल ते लिहिण्यासाठी आम्ही रस्त्यावर पडलेल्या मुली नाही आहोत.”

या मुलाखतीत सोनालीने लग्न करायला अजून वेळ असल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे लग्नाला फुलवा खामकर आणि प्रार्थना बेहरे या माझ्या करवली असतील असंही तिने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 4:44 pm

Web Title: sonalee kulkarni slams trollers after her marriage rumours ssv 92
Next Stories
1 श्वेताची देवदत्तसोबत कॉफी डेट
2 जयललिता यांचा भास व्हावा असा कंगनाचा लूक
3 ‘या’ कारणामुळे होतेय दिशा- आदित्यची चर्चा
Just Now!
X