News Flash

सोनाली म्हणते, ‘देशातील विद्यार्थ्यांना वाचवू शकत नाही आणि..’

सोनालीने मोदी सरकारवर साधला निशाणा

सोनाली कुलकर्णी

जेएनयू विद्यापीठ संकुलात १ आणि ४ जानेवारी रोजी झालेल्या तोडफोड प्रकरणाचा अनेक बॉलिवूड कलाकारांनी निषेध केला. त्यानंतर आता मराठी कलाकार सोनाली कुलकर्णी हिने ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. ‘आपल्या देशातील विद्यार्थ्यांना वाचवू शकत नाही आणि यांना दुसऱ्या देशातील अल्पसंख्याकांना संरक्षण द्यायचे आहे’, असं ट्विट सोनालीने केलं.

#irony हा हॅशटॅग वापरत सोनालीने सरकारच्या धोरणांमधील विरोधाभासाला अधोरेखित केले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावरूनही सोनालीने सरकारवर निशाणा साधला.

दीपिकाचा पाठिंबा
अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने जेएनयूतील हल्ल्याप्रकरणी निषेध नोंदविला आहे. मंगळवारी सायंकाळी तिने जेएनयू विद्यापीठाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या हल्ल्यानंतर कलाकारांनी या घटनेचा निषेध केला आणि मोदी सरकारवर जाहीर टीकाही केली. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आले. तेथे सिनेसृष्टीतील दिग्दर्शक, कलाकार सहभागी झाले होते.

तोडफोडप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या दोन एफआयआरमध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या नेत्या आइशी घोष यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. संकुलात ५ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात घोष जखमी झाल्या होत्या. पोलिसांनी रविवारी रात्री दोन एफआयआर दाखल केले. हिंसाचारप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला असला तरी पोलिसांनी याप्रकरणी अद्याप एकाही व्यक्तीला अटक केलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 9:04 am

Web Title: sonalee kulkarni tweet on jnu incident ssv 92
Next Stories
1 #boycottchhapaak: दीपिकाविरोधात नेटकरी आक्रमक, चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी
2 रॉक संगीताचा बादशाह एल्विस प्रेस्ली
3 JNU Protest : दीपिका पदुकोण जेएनयूमध्ये; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा
Just Now!
X