देशात उद्दभवलेल्या करोना माहामारीच्या संकटानंतर आता पुन्हा एकदा सारं काही सुरळीत होत आहे. यातच आता मराठी सिनेसृष्टीतही अनेक नवे प्रोजेक्ट सुरु आहेत. अनेक मराठी चित्रपटांच्या घोषणा होत असतानाच त्यात आता आणखी एका बिग बॅनर चित्रपटाची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी अतिशय लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या तमाशा लाईव्ह या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तसेच चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले. आता चित्रपटाच्यी चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी ‘तमाशा लाईव्ह’ या बिग बॅनर चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. पोस्टरवरूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली होती. संजय जाधव दिग्दर्शित आणि सचित पाटील, सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत.

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

दिवाळी २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘तमाशा लाईव्ह’ची अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग यांनी निर्मिती केली आहे तर सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सचित पाटील निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. या संगीतमय चित्रपटाला अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभले असून क्षितिज पटवर्धन यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत. या चित्रपटात सुमारे तीस गाणी आहेत. मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.

‘तमाशा लाईव्ह’विषयी दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ”सोनाली आणि माझी सुरुवातीपासूनच मैत्री असल्याने त्याचा फायदा आम्हाला काम करतानाही होत आहे. मुळात सोनाली एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्या कामाबद्दल मला अधिक काही सांगायची गरजच नाही. सचित पाटीलचा अभिनयही आपण सर्वांनीच पाहिला आहे. प्रथमच तो निर्मात्याची धुराही सांभाळणार आहे आणि ‘प्लॅनेट मराठी’सोबत हा माझा दुसरा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे साहजिकच मी खूप खूष आहे. एकंदरच ‘तमाशा लाईव्ह’साठी मी खूपच उत्सुक आहे.”