02 April 2020

News Flash

‘अप्सरा’ने केलं लग्न? उलट्या मंगळसूत्रावरून चर्चांना उधाण

सोनालीने दिलेलं उत्तर चाहत्यांना पेचात पाडणारं आहे.

सोनाली कुलकर्णी

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यामागचं कारण म्हणजे तिने सोशल मीडियावर नुकताच पोस्ट केलेला एक फोटो आणि त्या फोटोवरून एका चाहतीला दिलेलं उत्तर. या नव्या फोटोमध्ये सोनाली पारंपरिक वेशभूषेत पाहायला मिळतेय. गुलाबी रंगाची साडी, दागदागिने, नथ आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मंगळसूत्र. हे मंगळसूत्र तिने उलटं का घातलं यावरून इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.

‘तुमचं मंगळसूत्र उलटं झालं आहे’, अशी कमेंटसुद्धा एका चाहतीने तिच्या फोटोवर केली. यावर सोनालीने दिलेलं उत्तर चाहत्यांना पेचात पाडणारं आहे. ‘लग्नानंतर काही दिवस उलटंच मंगळसूत्र घालतात’ असं उत्तर सोनालीने त्या चाहतीला दिलं. त्यामुळे सोनालीचं लग्न झालं का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

आणखी वाचा : ऐकलंत का? सई ताम्हणकरच आहे सविता भाभी!

गेल्या काही दिवसांपासून सोनालीच्या लग्नाच्या जोरदार चर्चा होत्या. सोनालीच्या तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता आणि त्यावरून तिच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली. कुणाल बेनोडेकर या व्यक्तीशी तिचं नाव जोडलं गेलं होतं. मात्र यावर सोनालीने अद्याप अधिकृतपणे काही माहिती दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 1:10 pm

Web Title: sonalee kulkarni wedding rumors after she wears mangalsutra ssv 92
Next Stories
1 ऐकलंत का? सई ताम्हणकरच आहे सविता भाभी!
2 ‘तेजस’मध्ये कंगना; होणार एअर फोर्स पायलट
3 सरसंघचालकांचं वक्तव्य हास्यास्पद – सोनम कपूर
Just Now!
X