News Flash

रुग्णालयाला मदत करून अभिनेत्री साजरा करणार वाढदिवस

अभिनेत्रीचा स्तुत्य उपक्रम

संग्रहित छायाचित्र

करोनाचं संकट असताना सध्याच्या घडीला प्रत्येक जण आपापल्या परीने जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने रुग्णालयाला मदत करुन अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. १८ मे रोजी सोनालीच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीतील यशवंत राव चव्हाण मेमोरियल हॉस्पीटलला मदत दिले जाणार आहे.

यंदाचा वाढदिवस कसा साजरा करणार असा प्रश्न चाहत्यांनी सोनालीला विचारला असता तिने तिची कल्पना बोलून दाखवली. सोनालीला वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देण्याऐवजी तिच्या चाहत्यांनी व कुटुंबीयांनी जमेल तितकी रक्कम रुग्णालयाच्या मदतीसाठी देण्याची ही कल्पना होती. सोनाली जमलेल्या पैशांमध्ये स्वत:चे काही पैसे मिळवून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट्स विकत घेणार आहे. सर्वांनाच सोनालीची ही कल्पना आवडली आणि अनेकांनी तिला सढळ हस्ते मदत केली आहे. इंडस्ट्रीमधील तिच्या मित्रमैत्रिणींनी, कुटुंबीयांनी व सोनालीच्या चाहत्यांनी मिळून पैसे जमा केले आहेत.

आणखी वाचा : “राजकीय नेत्याशी माझं लग्न झालेलं नाही”; लग्नाच्या अफवांवर सोनालीचं स्पष्टीकरण

याविषयी सोनाली म्हणाली, “या संकट समयी माझ्याकडून जेवढं शक्य आहे ते मी करायचा प्रयत्न करत आहे. जिथे पैशांची मदत करण्याची गरज होती तीसुद्धा मी वेळोवेळी केली आहे. वाढदिवस प्रत्येक वर्षी येतो आणि गिफ्ट्स सुद्धा, मात्र यावेळी मला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे आणि मी समाधानी आहे की माझ्या हक्काच्या मंडळींनी मला यासाठी पूर्णपणे साथ दिली. यावर्षीचा वाढदिवस मला कायम लक्षात राहील.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 3:57 pm

Web Title: sonalee kulkarni will celebrate her birthday in a unique way ssv 92
Next Stories
1 अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर कुत्र्याने केला हल्ला; करावी लागली प्लास्टिक सर्जरी
2 ‘गेंदा फूल’वर जॅकलिनचा भन्नाट डान्स; पाहा ‘हा’ व्हिडीओ
3 “आधी त्या पैशांचा हिशोब द्या”; आयनॉक्सला दिग्दर्शकाने विचारला जाब
Just Now!
X