News Flash

आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत; कॅन्सरग्रस्त सोनाली बेंद्रेला बॉलिवूडची साथ

सोनालीला कॅन्सरचं निदान झालं आहे. ती सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. तिनं लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी बॉलिवूडनं प्रार्थना केली आहे.

अकाऊंटवर 'इंडिया बेस्ट ड्रामेबाझ'या रिअॅलिटी शोची सोनाली परीक्षक होती.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला आहे. तिने स्वत: ट्विट करत चाहत्यांना ही धक्कादायक माहिती दिली आहे. सध्या सोनाली न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. तिनं लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी बॉलिवूडमधली कलाकारांनी तिच्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.

‘कधी कधी तुम्हाला काही गोष्टींची कुणकुण लागते आणि अनपेक्षितपणे तुमच्या आयुष्यात बदल होतो. मला हाय- ग्रेड कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. सतत वेदना जाणवत असल्याने काही चाचण्या केल्या आणि त्यातून कॅन्सर झाल्याचं अनपेक्षितपणे निदान झालं. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी त्यावर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या मार्गातील प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्यास मी सज्ज आहे. यात गेल्या काही दिवसांपासून लोकांकडून मला मिळत असलेल्या प्रेमाची फार मदत होत आहे. मी ही लढाई लढण्यास सज्ज आहे.’ अशी भावनिक पोस्ट तिनं लिहली.

तू सक्षम महिला आहे आणि तुझ्यापुढे उभ्या असलेल्या संकटावर तू नक्कीच मात करशील असं लिहित बॉलिवूड कलाकारांनी तिचं मनोबल वाढवलं आहे. तसेच तिनं लवकर बरं व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थनाही केल्या आहेत.

‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिअॅलिटी शोमध्ये ती परीक्षक होती. मात्र वैयक्तिक कारण सांगत सोनालीने हा शो अर्ध्यावरच सोडला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 4:03 pm

Web Title: sonali bendre diagnosed with cancer bollywood wishes for recovery
Next Stories
1 आएशा टाकियाला धमक्या; मुंबई पोलीस दखल घेत नसल्याची पतीने केली तक्रार
2 पिक्चर अभी बाकी है! ‘एमएस धोनी’ची सेकंड इनिंग लवकरच रुपेरी पडद्यावर
3 ..अन् जान्हवीने इन्स्टाग्रामवरून डिलीट केले फोटो
Just Now!
X