06 March 2021

News Flash

कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर सोनाली करतेय हा अनोखा व्यायाम

या व्हिडीओमध्ये सोनाली पाण्यात व्यायाम करताना दिसत आहे

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हाय ग्रेड कॅन्सरवर उपचार घेऊन काही महिन्यांपूर्वीच भारतात परतली आहे. मायदेशी परतल्यानंतर सोनाली विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. या कार्यक्रमांमध्ये ती तिच्या कर्करोगाविषयी तिचे मत मांडत असते. आता सोनालीने तिचा अॅक्वा थेरपीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झालेला पाहायला मिळतोय.

सोनालीने तिच्या ट्विटर खात्यावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली पाण्यात व्यायाम करताना दिसत आहे. दरम्यान हा तिच्या कॅन्सरवरील उपचाराचा भाग असल्याचे देखील सोनालीने सांगितले आहे.

‘हे जितके सोपे दिसते तितके सोपे नाही. माझी एक्वा थेरपी फार कठीण आहे पण माझी खात्री आहे की मला माझ्या आरोग्याच्या पूर्वपदावर आणायला नक्की मदत करेल’ असे तिने ट्विटमध्ये लिहिले होते. तिचा हा व्हिडीओ सर्वांसाठी एक प्रेरणादायी ठरला आहे. हा व्यायाम जितका सोपा दिसत आहे तितका मुळीच नाही असे देखील सोनाली चाहत्यांना व्हिडीओमध्ये सांगत आहे.

‘सरफरोश’, ‘हम साथ साथ है’ आणि ‘लज्जा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या सोनालीने कॅन्सरची माहिती दिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र सोनाली या आजाराला खंबीरपणे सामोरी गेली. या आजारपणामध्ये सोनाली कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होती. इतकेच नाही तर तिने सहजरित्या या आजारावर मातदेखील केली. मात्र या संकटातून मार्ग काढण्यासाठी अभिनेत्री मनिषा कोईराला आणि क्रिकेटपटू युवराज सिंग यांची संघर्षगाथा कामी आल्याचे सोनालीने सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 6:43 pm

Web Title: sonali bendre shares a video of aqua therapy session avb 95
Next Stories
1 ‘बिग बॉस मराठी’च्‍या घरात नवीन फिटनेस कोच
2 ‘भारत’ची २५० कोटींची कमाई, कतरिनाने साजरा केला आनंद
3 बर्थडे पार्टीमधील सोनमच्या ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क!
Just Now!
X